घरदेश-विदेशअदानी-मोदी नवा अंक सरू

अदानी-मोदी नवा अंक सरू

Subscribe

लोकसभा सचिवालायाने खासदारकी रद्द झाल्यानंतर शनिवारी माध्यमांसमोर येत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर पुन्हा भाष्य करीत सत्ताधार्‍यांना लक्ष्य केले. तर राहुल गांधींच्या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर देत ते जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला. अदानी-मोदींच्या या आरोपांच्या नव्या अंकाचे पडसाद शनिवारी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी हेच खरे देशद्रोही असल्याचे विधानसभेत सांगितले. ते सातत्याने सावरकरांचा अपमान करतात. त्यांनी एक दिवस तरी सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावे, असे आव्हान देत मुख्यमंत्री शिंदे यांनी एक प्रकारे आपण भाजप सरकारसोबत असल्यावर शिक्कामोर्तब करत राहुल गांधी यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल,असा इशारा दिला.

शिक्षेचा आणि अदानींचा काही संबंध नाही-प्रसाद

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना जी शिक्षा झाली आहे त्याचा उद्योगपती गौतम अदानींशी काहीही संबंध नाही, असे प्रत्युत्तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी दिले.राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मी विचारपूर्वक बोलतो, असे विधान केले होते. हाच धागा पकडून रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत खोट्या आणि निराधार विधानाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या स्वभावानुसार सर्व जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर ते काहीच बोलले नाहीत. राहुल गांधी यांनी २०१९च्या वेळी एका भाषणादरम्यान केलेल्या विधानामुळे त्यांना शिक्षा झाली आहे.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी बोलले होते की सर्व मोदी आडनाववाले चोर आहेत. मोदी आडनाववाले बिहार, भारत, पश्चिम भारत आणि मागासलेल्या भागातून येतात. राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे या मागासवर्गीय लोकांचा अपमान झाला होता. राहुल गांधींना भरसभेत त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, पण अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींना अपशब्द वापरण्याचा अधिकार असेल तर पीडितांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. न्यायालयात पीडितांना वकिलांमार्फत त्यांच्या बाजूने बोलण्याची संधीही देण्यात आली. न्यायालयाने राहुल गांधी माफी मागणार का, असे विचारले, पण त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. याशिवाय राहुल गांधींवर मानहानीचे अजून सात खटले सुरू आहेत, असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

अदानी आणि मोदी यांचे नाते नवे नाही-राहुल गांधी 

- Advertisement -

उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते काही नवीन नाही, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सत्ताधारी भाजपला लगावला.खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून त्यांची भूमिका स्पष्ट केली. खासदारकी गेली असली तरीही राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाहीसाठी लढत राहणार असल्याचा निर्धार केला आहे. मी कोणालाही घाबरत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत राहणार, प्रश्न विचारत राहणार, असे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, मी तुमच्याशी खूप वेळा बोललो आहे की भारतात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची रोज नवनवी उदाहरणे मिळत आहेत. मी एकच प्रश्न विचारला होता. अदानींची शेल कंपनी आहे. त्यात २० हजार कोटी रुपये कोणीतरी गुंतवले. हा अदानींचा पैसा नाही. अदानींचा इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय आहे. मग हे पैसे कोणाचे आहेत, असा प्रश्न मी विचारला होता.

राहुल गांधी बोलले होते की सर्व मोदी आडनाववाले चोर आहेत. मोदी आडनाववाले बिहार, भारत, पश्चिम भारत आणि मागासलेल्या भागातून येतात. राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे या मागासवर्गीय लोकांचा अपमान झाला होता. राहुल गांधींना भरसभेत त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, पण अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींना अपशब्द वापरण्याचा अधिकार असेल तर पीडितांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. न्यायालयात पीडितांना वकिलांमार्फत त्यांच्या बाजूने बोलण्याची संधीही दिली. न्यायालयाने राहुल गांधी माफी मागणार का, असे विचारले, पण त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. याशिवाय राहुल गांधींवर मानहानीचे सात खटले सुरू आहेत, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.

राहुल गांधी देशद्रोहीच-शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याचा राहुल गांधींना अजिबात अधिकार नाही. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर बोलून सबंध ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ महिने आणि २४ तास काम करीत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी देशाबाहेर जाऊन देशाचा अपमान करीत आहेत. हाच मुळात देशद्रोह आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा सातत्याने अपमान केला. सावरकर हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे दैवत आहे. राहुल गांधी यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावे. त्यांना एक तास घाण्याला जुंपले तर त्यांना यातना समजतील. त्यामुळे त्यांचा निषेध करायचा तेवढा थोडाच आहे. राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांचाही अपमान केला आहे. त्याबद्दल न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आहे. आजही ते त्याच पद्धतीने बोलत असतील तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही आणि राहुल गांधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल

अदानींच्या बनावट कंपनीत २० हजार कोटी कुठुन आले, याचे उत्तर मोदींना द्यावेच लागेल-राहुल गांधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -