Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मला धमक्या मिळतायतं, सत्य बोलल्यास शीर कापले जाईल, अदर पुनावाला यांचा खळबळजनक...

मला धमक्या मिळतायतं, सत्य बोलल्यास शीर कापले जाईल, अदर पुनावाला यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

देशातील श्रीमंत आणि बड्या राजकीय हस्थींकडून धमकावण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि देशातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लस उत्पादित केली जात आहे. परंतु या सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक यांना अदर पुनावाला यांना देशातील व्यक्तींकडून धमक्या दिल्या जात आहेत. अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, मला धमक्या दिल्या जात आहेत. सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल अशी भीती अदर पुनावालांनी व्यक्त केली आहे. देशातील लसीचा वेळेवर पुरवठा करण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे देशाबाहेरही कोरोना लसीचे उत्पादन घेण्याचे अदर पुनावाला यांनी ठरवले आहे. तसेच सध्या अदर पुनावाला लंडनला निघूल गेले आहेत. पुनावाला यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आता देशात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

देशातील आघाडीची लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे मालक अदर पुनावाला यांनी “द टाईम्स”ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये अदर पुनावाला यांनी फोन कॉल हे वाईट गोष्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी असा खुलासा केला आहे की, देशातील श्रीमंत आणि बड्या राजकीय हस्थींकडून धमकावण्यात येत आहे. कोरोना लसींचे आश्वासन पाळण्यात अडथळा येत असल्यामुळे लंडनमध्ये कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे ठरवले असल्याचे पुनावाला यांनी म्हटलंय. तसेच सारखे येणारे फोन कॉल हे अत्यंत त्रासदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अदर पुनावाला यांनी फोन कॉलवरुन सांगितले की, देशातील शक्तिशाली नेते, व्यक्तिंचे फोन येतात. राज्यातील मुख्यमंत्र्यांचे, व्यावसायिक प्रमुखांचे कोविशिल्ड लसीच्या तात्काळ पुरवठ्याची मागणी करण्यासाठी फोन येत असतात. लस मिळवण्याची इच्छा आणि आक्रमकता यातील अंतर अभूतपूर्व असल्याचे अदर पुनावाला यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे. काही फोन कॉल धमक्यांचे आले आहेत. यामध्ये जर खर बोलोल तर शीर कापले जाईल अशी भीती अदर पुनावाला यांनी व्यक्त केली आहे.

खरे की खोटे देशाला कळायला हवं – आव्हाड

यावर राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील नागरिकांचे रक्षण आणि जीव वाचवणाऱ्या अदर पुनावाला यांना कोण धमकी देत आहे. अदर पुनावाला यांना धमकी कोणी दिली आणि हे काय प्रकरण आहे. यामध्ये खरे काय आणि खोटे काय हे देशातील नागरिकांना कळायला हवे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांना अदर पुनावाला यांना धमक्या मिळाल्याची बातमी एकली त्यानंतर आव्हाडांनी तात्काळ ट्विट करत यासंदर्भात खरे काय खोटे काय याबाबत माहिती झाले पाहजे असे म्हटले आहे. जितेंद्र अव्हाड यांनी म्हटले आहे की, सिरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत अशी बातमी आहे . द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत,आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल.देशाला हे कळायला हव #खरे_की_खोटे असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisement -

तसेच एक व्हिडिओही आव्हाडांनी प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, द टाईम्सला सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आदर पुनावाला यांनी मुलाखत दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला धमक्या मिळाल्या आहेत. जर खरे बोलले तर माझा गळा कापण्यात येईल, हे काय सत्य आहे आणि कोण त्यांना धमक्या देत आहेत. जो माणुस भारतातील ५० करोड लोकांना वाचवु शकतो अशा माणसाला कोण धमकी देऊ शकते. पुनावाला लंडनला का जात आहे. यामागचे सत्य देशातील सर्वांना समजले पाहिजे. कारण आताच्या घडीला विचारले तर देशातील सर्वात महत्त्वाचा माणुस कोण? तर तो आहे आदर पुनावाला असे आव्हाड म्हणाले आहेत. कारण जीव वाचवणाऱ्यापेक्षा मोठा कोणी नसतो. जीव घेणारे या भारतात भरपूर आहेत. स्मशान भूमी आणि कब्रस्तानमध्ये लागलेल्या रांगांवरुन समजते आहे जीव कसे जात आहेत आणि कोण जीव घेणारे आहे. परंतु जीव वाचवाणारा एकच आहे आणि तो अदर पुनावाल आहे. जर अदर पुनावाला भारतातुन गेले तर देशाची मोठी नामुष्की आहे.

- Advertisement -