घरमहाराष्ट्रअधिवेशनात जवळपास 26 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या, भाजपकडील खात्यांना झुकते माप

अधिवेशनात जवळपास 26 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या, भाजपकडील खात्यांना झुकते माप

Subscribe

आज पासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. हे अधिवेशन 25 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. आज पावसाळी अधिवेशनात 25826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहा समोर ठेवल्या. यात भाजपकडील खात्यांना 11 800 कोटी निधी दिल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाकडील मंत्र्यांच्या खात्यासाठी 6243 कोटी निधी देण्यात आला आहे.

भाजपच्या मंत्र्यांना दिलेला निधी –

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खात्याला 1596 कोटींचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान भाजपकडली मंगलप्रभात लोढा यांच्या पर्यटन खात्याला 551 कोटी, गिरीष महाजन यांच्या ग्राम विकास खात्याला 1301 कोटी, रवींद्र चव्हाण यांच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याला 508 कोटी, अतुल सावे यांच्या सहकार खात्याला 1608 कोटी, मंगलप्रभात लोढा यांच्या महिला व बालविकास खात्याला 1672 कोटी, गिरीष महाजन यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याला 235 कोटी, अतुल सावे यांच्या बहुजन कल्याण खात्याला 295 कोटी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वित्त व नियोजन खात्याला 500 कोटी निधी देण्यात आला आहे.

शिंदे गाटाला दिलेला निधी –

- Advertisement -

तर शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्यासाठी 6243 कोटी निधी देण्यात आला आहे. यात मुख्यंत्री एकना शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याला 886 कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर प्रा. तानाजी सावंत यांच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याला 2237 कोटी निधी देण्यात आला आहे. दरम्यान केंद्राच्या योजनांचा हिस्सा 1462 कोटी, महात्मा जोतीब फुले योजनेसाठी 232 कोटी, आणीबाणीमध्ये तुरुंगात गेलेल्यांसाठी 119 कोटी निधी देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -