Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मध्य रेल्वेच्या मुंबई पुण्याहून अतिरिक्त विशेष ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेच्या मुंबई पुण्याहून अतिरिक्त विशेष ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेच्या विशेष रेल्वेचे वेळापत्रक

Related Story

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या मुंबई पुण्याहून अतिरिक्त विशेष ट्रेनचे नियोजन केले आहे. मुंबई- छपरा विशेष ट्रेन, मुंबई भागलपूर त्याचप्रमाणे मुंबई ते दानापूर दरम्यान काही अतिरिक्त विशेष ट्रेन सुरु केल्या आहेत. त्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

१. मुंबई-छपरा विशेष ट्रेन

01197 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस दिनांक २१ एप्रिल २०२१ ला १४.३० वाजता सुटेल व छपरा येथे तिसर्‍या दिवशी १०.५० वाजता पोहोचेल. 01198 विशेष छपरा येथून १९ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ०५.४० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी ००.४० ​​वाजता पोहोचेल. भिवंडी रोड, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, बयाना, आग्रा फोर्ट, टूण्डला जंक्शन, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती, गोरखपूर, भटनी, सीवान जंक्शन या ठिकाणी या गाडीचे थांबे असतील. या गाडीत २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ९ द्वितीय आसन श्रेणी अशी संरचना करण्यात आली आहे.

२. मुंबई-छपरा विशेष ट्रेन

- Advertisement -

01207 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी २३.४५ वाजता सुटेल आणि २० एप्रिल २०२१ रोजी ००.१५ वाजता छपरा येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे 01208 विशेष छपरा येथून दि. २० एप्रिल २०२१ रोजी ​​वाजता १६.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी १५.२० वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, भिवंडी रोड, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, बयाना, आग्रा फोर्ट, टूण्डला जंक्शन, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती, गोरखपूर, भटनी, सीवान जंक्शन या ठिकाणी गाडी थांबेल. गाडीची संरचना २ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, १३ द्वितीय आसन श्रेणी अशी असणार आहे.

३. मुंबई-भागलपूर विशेष ट्रेन

01203 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक २३ एप्रिल २०२१ आणि ३० एप्रिल २०२१ रोजी १८.०० वाजता सुटेल आणि भागलपूर येथे तिसर्‍या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. तर 01204 विशेष भागलपूर येथून दि. १८ एप्रिल २०२१, २५ एप्रिल २०२१ आणि २ मे २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २३.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., सासाराम, गया जं., किउल जं., जमालपूर येथे थांबेल. गाडीची संरचना ३ तृतीय वातानुकूलित, १७ आसन श्रेणी अशाप्रकारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

पूर्णतः आरक्षित 01197 आणि 01203 या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग आधीपासूनच खुले आहे आणि 01207 या विशेषचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. १७ एप्रिल २०२१ रोजी सुरू होणार आहे.

पुणे ते दानापूर विशेष रेल्वे

01451विशेष दिनांक २१ एप्रिल २०२१ आणि २८ एप्रिल २०२१ रोजी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी २०.०० वाजता दानापूरला पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जंक्शन या ठिकाणी थांबेल. गाडीची संरचना १ प्रथम वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित अशी असणार आहे.

पूर्णपणे आरक्षित असलेल्या 01451 विशेष गाडीचे विशेष शुल्कासह बुकिंग १७ एप्रिल २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. त्याचप्रमाणे तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.


हेही वाचा – रविवारी मध्य रेल्वे, हार्बरवर मेगा ब्लॉक

 

 

- Advertisement -