घरमहाराष्ट्रपुणेशिंदेंची चूक पाटलांनी सुधारली, उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख

शिंदेंची चूक पाटलांनी सुधारली, उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आजा वाढदिवस आहे. या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राजकीय मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान शिंदे गटात सामील झालेल्या माजी खासदार आढळराव पाटील यांनी ट्विटरवर दिलेल्या शुभेच्छा लक्षवेधी ठरत आहेत.

आढळराव पाटील यांनी ट्विटमध्ये शिवसेना पक्षप्रमुख, मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!, दिल्या आहे. या ट्विटमध्ये आढळराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे. हे ट्विट त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पेजला टॅग केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा –

- Advertisement -

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. मात्र, या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरेंचा उल्लेख फक्त माजी मुख्यमंत्री असा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -