घरमहाराष्ट्र'लोकशाही' आणि 'संविधाना'साठी आदित्य ठाकरेंची राहुल गांधींना पदयात्रेत साथ

‘लोकशाही’ आणि ‘संविधाना’साठी आदित्य ठाकरेंची राहुल गांधींना पदयात्रेत साथ

Subscribe

आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि सचिन अहिर हे नेतेसुद्धा उपस्थित होते.

राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी निघाले आहेत. ही पदयात्रा अध्या महाराष्ट्रात आहे. काल 11 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे सुद्धा पदयात्रेमध्ये सहभागी झाले. देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. याविरोधात लढा देण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत मी सहभाग घेतला आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी काल नांदेडमध्ये दाखल झाले होते. भारत जोडो यात्रेत सहभागी होताच त्यांनी राहुल गांधीं यांची गळाभेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे काही अंतर पायी चालले. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे एकमेकांची चर्चा करतानाही दिसले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या यात्रेत आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत चालले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि सचिन अहिर हे नेतेसुद्धा उपस्थित होते.

- Advertisement -

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज नांदेडमध्ये दाखल झाले होते. भारत जोडो यात्रेत सामील होताच त्यांनी राहुल गांधींची गळाभेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींसोबत त्यांनी काही अंतर पायी चालले. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करतानाही दिसले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली होती. या यात्रेचा आजचा 65 वा दिवस आहे. 7 नोव्हेंबरच्या रात्री तेलंगणामधून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील देगलुरमध्ये आली. आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील सहावा दिवस आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटातील नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सुद्धा सहभाग घेतला. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असे काँग्रेस कडून सांगण्यात आले.

- Advertisement -

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. या यात्रेत आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत चालले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि सचिन अहिर हे उपस्थित होते.

देशात लोकशाही राहिली नाही, शिव्या देणारे, महिलांचा अपमान करणारे त्याचबरोबर बंदुक काढणारे मंत्री सरकार चालवत आहेत. आदित्य ठाकरेंनी भारत जोडो यात्रेतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत वॉकिंग फॉर डेमॉक्रसी आणि कॉन्सिट्युशन असे कॅप्शनसुद्धा त्याला दिले आहे. भारत जोडो यात्रेला जनतेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत हमाल, मापाडी, पोतराज, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.


हे ही वाचा – अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार? प्रतिज्ञापत्राद्वारे सीबीआयचा विरोध

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -