घरमहाराष्ट्रशपथ घेऊन पाठित खंजीर खुपसणारे हे गद्दारच; आदित्य ठाकरेंचा मंत्री दादा भुसेंना टोला

शपथ घेऊन पाठित खंजीर खुपसणारे हे गद्दारच; आदित्य ठाकरेंचा मंत्री दादा भुसेंना टोला

Subscribe

 

मुंबईः अन्नाची शपथ घेऊन यांनी आमच्या पाठित खंजीर खुपसला आहे. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा. हे गद्दारच आहेत, असा टोला आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे यांना लगावला. एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. आरोप सिद्ध झाले तर आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा देईन. मात्र आरोप सिद्ध न झाल्यास आमच्या मतांवर निवडून आलेल्या महागद्दारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मंत्री दादा भुसे यांनी केली.

मंत्री दादा भुसे यांच्या या मागणीला आमदार आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. हे गद्दारच आहेत. त्यांच्यावर काय आणि किती विश्वास ठेवणार आपण. मुळात ज्यांनी अन्नाची शपथ घेऊन आमच्या पाठित खंजीर खुपसला त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री दादा भुसेंंवर केली.

- Advertisement -

दादा भुसे यांचा फोटो ट्वीट करत खासदार संजय राऊत म्हणाले की, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.

या आरोपाला दादा भुसे यांनी विधासभेत उत्तर दिले. दादा भुसे म्हणाले की, “आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर निवडून आलेले महागद्दार राज्यसभेवर निवडून गेले. संजय राऊत यांनी काल एक ट्वीट केले आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या ट्वीटची चौकशी करावी. त्या चौकशीमध्ये मी दोषी आढळलो तर आमदारकीचा, मंत्रीपदाचा राजीनामा देऊन राजकारणातूनही निवृत्त होईन. पण, जर यामध्ये खोटे आढळून आलं तर गद्दारांच्या मतांवर निवडून आलेल्या महागद्दारांनी राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा द्यावा. सामनाच्या संपादकपदाचाही राजीनामा द्यावा.” त्यानंतर एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -