मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन दिवसीय दौरा पार पडला. या तीन दिवसात राज्यामध्ये 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली असल्याचे जाहीर करण्यात आले. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात आहे. मात्र तरीही विरोध मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (24 जानेवारी) पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्यावर हास्यास्पद करार केल्याचा आरोप केला. (Aditya Thackeray alleges that CM Devendra Fadnavis made a ridiculous deal during his Davos visit)
गेल्या 2 दिवसात घटनाबाह्य सरकारने जसे पैसे उधळले, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी 28 तासात जसे पैसे खर्च केले, यावेळी तसे काही झाले नाही, हे आनंदाचे आहे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, गेल्या 2-3 दिवसात राज्यात एवढी गुंतवूक आली आहे. त्यामुळे एसटीचे विलीनकरण आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासारखी कामे होती. कारण 54 कंपन्यांसोबत करार केले आहेत. त्यातील विदेशी कंपन्या 11 आहेत आणि भारतीय कंपन्या 43 आहेत आणि 31 कंपन्या राज्यातील आहेत. जर सर्वात जास्त कंपन्या राज्यातील असतील तर गेल्या 2 वर्षात मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन आपल्याकडे या कंपन्यांसोबत करार का केले नाहीत? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला.
हेही वाचा – Shiv Sena UBT : कोकणात उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली; मेळाव्याला अनेक आमदार, खासदारांची गैरहजेरी
आदित्य ठाकरे म्हणाले की, मी सुद्धा दावोसमध्ये जाऊन विदेशी कंपन्या आणि भारतीय कंपन्याकडून गुंतवणूक आणली आहे. दावोसमध्ये वेगवेगळ्या सेक्टर मधले लोक येतात आणि त्यांना भेटण्याची संधी मिळते. पण या लोकांना न भेटत आपल्याच इथल्या लोकांच्या भेटी घेऊन आपला इन्वेस्टमेंटचा फुगा मोठा दिसावा, असा प्रयत्न केला गेला. वेगवेगळ्या उद्योगपतींशी बोलणे कुठेच होताना दिसले नाही. त्यामुळे दावोसच्या अर्ध्या किमतीत तुम्ही कराराचा कार्यक्रम आपल्याकडेच केला असता, इथेच भेटी घेतल्या असत्या तर बरे झाले असते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
दावोसमध्ये हास्यास्पद करार केल्याचा आरोप
दरम्यान, आदित्य ठाकरे दावा करताना म्हणाले की, मला सरकारमधील काही लोकांकडून कळलं आहे की, एसआरए वाले आहेत, त्यांना पण दावोसला पुढच्यावेळी करार करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. पुढच्या वेळी जे रस्त्यांचे कंत्राटदार आहेत, त्यांच्यासोबत पण करारनामे होणार आहेत. अमुक अमुक कंत्राट तुम्हाला मिळालेला आहे, आता पुढचं काम तुम्ही सुरू करा. ही घ्या ट्रॅफिकची परवानगी, असे काही हास्यास्पद करार केले आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अमित शहांसोबत मांडीला मांडी लावून बसले, दोघांमध्ये काय चर्चा झाली?