Homeमहाराष्ट्रAaditya Thackeray : उद्योगमंत्री फक्त पत्रकार परिषदेसाठी दावोसला गेले, ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray : उद्योगमंत्री फक्त पत्रकार परिषदेसाठी दावोसला गेले, ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

उद्योगमंत्री उदय सामंत मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला का गेले नाहीत? उद्योगमंत्री फक्त पत्रकार परिषद घेण्यासाठी दावोसला गेले होते. कारण बाकी सगळे काम मुख्यमंत्र्यांनी केले, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली. 

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन दिवसीय दौरा पार पडला. या तीन दिवसात राज्यामध्ये 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली असल्याचे जाहीर करण्यात आले. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात आहे. मात्र तरीही विरोध मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (24 जानेवारी) पत्रकार परिषद घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला का गेले नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Aditya Thackeray alleges that Industry Minister Uday Samant went to Davos only for a press conference)

आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी उद्योगमंत्री दावोसला पोहोचायला हवे होते. पण ते मुख्यमंत्र्यांच्या नंतर तिथे गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते म्हणून उदय सामंत उशिरा निघाले का? आणि महाराष्ट्रात उद्योगमंत्र्यांचा असा काय कार्यक्रम होता की, ते दावोसला थांबू शकत नव्हते? पक्षांतर्गत नाराजी होती का? मुख्यमंत्री सगळे काम सोडून तिथे थांबले होते, मग उद्योगमंत्री तिथे का थांबू शकले नाहीत? उद्योगमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला का गेले नाहीत? एकच दिवस ते तिथे थांबले आणि परत भारतात आले. मग ते भारतात लगेच का आले? एकनाथ शिंदे नाराज होते म्हणून आले का? त्यांची समज काढण्यासाठी त्यांना पाठवलं का? जर 4 दिवस जर उद्योगमंत्री दावोसला थांबू शकत नाहीत, तर कामं कशी होणार? उद्योगमंत्री फक्त पत्रकार परिषद घेण्यासाठी दावोसला गेले होते. कारण बाकी सगळे काम मुख्यमंत्र्यांनी केले, असे म्हणत ठाकरेंनी टीका केली.

हेही वाचा – Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरेंचा सवाल, हास्यास्पद करार केल्याचा आरोप

मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेणे गरजेचे

दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना सल्ला देऊ इच्छितो. सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. पण इतर राज्यातील मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन मॅग्नेटिक महाराष्ट्र सारखा कार्यक्रम घेतात. मात्र मागील दोन वर्षापासून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. करार करण्यासाठी संपूर्ण चार दिवस दावोसमध्ये घालवण्यात अर्थ नव्हता. दावोसला गेल्यानंतर जगभरातले नेते आणि विविध देशातील उद्योगपतींच्या भेटीगाठी घेणे गरजेचे होते. तो प्रयत्न मी केला होता. मात्र, यावेळी तसा कुठलाही प्रयत्न झाला नाही. कोणत्याही भेटीगाठी घेतल्या नाहीत. काही गुंतवणूक चांगल्या झाल्या त्याचा आनंद आहे. पण काही ठिकाणी गुंतवणूक झाल्यासारखं दाखवून फसवलं जात आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

हेही वाचा – Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अमित शहांसोबत मांडीला मांडी लावून बसले, दोघांमध्ये काय चर्चा झाली?