Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी साहसी पर्यटनासाठी नियमावली पाळावी लागणार, पर्यटन क्षेत्रातील शिथिलतेवर आदित्य ठाकरे म्हणाले...

साहसी पर्यटनासाठी नियमावली पाळावी लागणार, पर्यटन क्षेत्रातील शिथिलतेवर आदित्य ठाकरे म्हणाले…

महाराष्ट्रात कोरोना संपेल तेव्हा पर्यटनाला उभारी मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरु - आदित्य ठाकरे

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आली आहे. या पर्यटनाबाबत लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, ३ महत्त्वाचे माध्यम आहेत त्यापैकी, जमीनीवरली साहसी पर्यटन, समुद्रातील पर्यटन आणि हवेतील साहसी पर्यटन आहेत. या पर्यटनामध्ये कोणतीही नियमावली नसल्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना आणि अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने नियमावली आणली आहे. साहसी पर्यटन महाराष्ट्रात वाढावं अशी राज्य सरकारची आपेक्षा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की, या पर्यटनाबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील साहसी पर्यटनाच्या धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये साहसी पर्यटनावर नियमावली जारी करण्यात येणार आहे. काळजी घेऊन पर्यटनाबाबत विचार करत असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे. यामध्ये स्पोर्टस, गिर्यारोहक पर्यटनाचा समावेश करण्यात आला नसून केवळ फक्त टुरिझममध्ये ट्रेक,स्कुबा डायव्हिंगसाठी गेल्यास काही नियमावलीचं पालन करावे लागणार आहे.

पर्यटनास शिथिलता नाही

- Advertisement -

राज्यात पर्यटनामध्ये शिथिलता देण्यात आली नाही. राज्यातील नागरिकांचा जीव वाचवणे यावर प्राथमिकता प्राधान्य दिलं आहे. मागील वर्षापासून पर्यटन खातं उपाययोजना करत आहे. जेव्हा महाराष्ट्रात कोरोना संपेल तेव्हा पर्यटनाला उभारी मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात पर्यटन वाढवण्यासाठी पाउलं उचलण्यात येत आहेत. कोरोना संपल्यानंतर महाराष्ट्र अग्रेसर कसा राहील याबाबत राज्य सरकार काम करत आहे. अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारकडन रिवेंज टुरीझमबाबत बोललं जात आहे. कोरोनाच्या काळत सर्वच जण घरी बसून असल्यामुळे सगळ्यांनाच वाटत आहे की, बाहेर पडले पाहिजे थोडं फिरलं पाहिजे. परंतु राज्यातील कोरोनाची दुसऱी लाट ओसरत असताना आता तीसरी लाट येत आहे. महाराष्ट्रात इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांचे लसीकरण, तसेच विना चाचणी आलेले प्रवासी या सगळ्यावर काम करुनच नागरिकांचे लसीकरणाबाबतही काम करावं लागणार आहे. आपण कितीही बोललं पर्यटन वाढवायचे आहे परंतु ते शक्य नाही यामुळे कोरोना काळात जे काही पर्यटनाच्या नियमावली आहेत यावर आम्ही काम करत आहोत जेणेकरुन पर्यटन सुरु झाल्यानंतर काही अडथळे येणार नाही असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -