घरमहाराष्ट्रमुंबईतील कामासाठी चेन्नईत मुलाखती, सरकारवर आगपाखड करत आदित्य ठाकरेंनी पुरावाच सादर केला

मुंबईतील कामासाठी चेन्नईत मुलाखती, सरकारवर आगपाखड करत आदित्य ठाकरेंनी पुरावाच सादर केला

Subscribe

मुंबई – आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणाहून लोक येत असतात. नोकरीनिमित्त देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील तरुण मंडळी मुंबईत येतात. वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी कंत्राटदार बदलला गेला. मात्र, या प्रकल्पात काम करण्यासाठी चेन्नईत मुलाखती घेण्यात येत आहे. मुंबईत काम करण्यासाठी चेन्नईत मुलाखती का? असा सवाल युवानेते आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंनी सरकारवर आगपाखड केली. यावेळी कंत्राटदार कंपनीने प्रसिद्ध केलेली जाहिरातही आदित्य ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत सादर केली. या जाहिरातीत मुलाखत चैन्नईत होत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

हेही वाचा – शिंदेंच्या कॅबिनेटने घेतले 11 महत्त्वाचे निर्णय, धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा काढणार

- Advertisement -

कोरोना काळात वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पाचं काम रखडलं होतं. त्यानंतर या प्रकल्पासाठी कंत्राटदार बदलला गेला. कंत्राटदार बदलला याला आमचा विरोध नाही. कोणत्या कंपनीकडे काम गेलं याच्याशीही आमचा संबंध नाही. मात्र, मुंबईत काम करण्यासाठी चेन्नईत मुलाखती का घेतल्या जात आहेत. २५ सप्टेंबर २०२२ रोजी चेन्नईत या मुलाखती होणार आहेत. तिथे जाण्यासाठी सरकार इच्छुक उमेदवारांना तिकिटे काढून देणार आहे का, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी दाखवलेली हीच ती कंपनीची जाहिरात

- Advertisement -

राज्यात रोजगार प्रवेश कधी होणार?

चेन्नईत डीएमकेचं सरकार आहे. आर्थिक, पर्यावरणासाठी तिथे चांगलं काम सुरू आहे. मी तिथल्या कामाविषयी नियमित माहिती घेत असतो. पण तिथेही मुंबईसारखंच झालं असतं म्हणजे काम चैन्नईत आणि मुलाखती मुंबईत झाल्या असत्या तर तिथले भूमिपूत्रही नाराज झाले असते. तिथल्या सरकारनेही आवाज उठवला असता. म्हणूनच आम्ही याविरोधात आवाज उठवत आहोत. महाराष्ट्रात धांगडधिंगाडा सुरू आहे. आज हा पक्षात आला, उद्या तो आला हेच यांचं पक्ष प्रवेश सुरू आहेत. तुम्हाला पक्षप्रवेश करायचे असतील तर करा, आम्हाला काहीच हरकत नाही. पण राजकीय पक्ष प्रवेश सुरू असताना राज्यात रोजगार प्रवेश कधी होणार, असा जळजळीत सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – चौकशी करा, पण आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही स्पष्ट करा : शरद पवार

महाराष्ट्राला संधी मिळत नाही

वर्सोवा वांद्रे सी लिंक एमआरडीसी अंतर्गत होत आहे. एमआरडीसीने अॅपको कंपनीला कंत्राट दिलंय. कंपनीबाबत आम्हाला काहीच म्हणणं नाही. पण कंपनीकडून मुलाखती चैन्नईत होत आहेत, याची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे की नाही याबाबतही साशंकता आहे. मुंबई, महाराष्ट्राला संधी मिळत नाही, हे तरी मुख्यमंत्र्यांना माहित आहे का? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

हेही वाचा – शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात याचिका, उद्या होणार सुनावणी

महाराष्ट्रातील रोजगार बाहेर जाता कामा नये

मुलाखती चेन्नईत होत आहेत, याचं वाईट वाटत नाही. जर का महाराष्ट्रातील मुंबई, ठाण्यात, कोल्हापूर, संभाजीनगर येथूनही मुलाखती झाल्या असत्या आणि देशभरही मुलाखती झाल्या असत्या तर आम्हाला विरोध करण्याचं कारणच नव्हतं. उलट देशभरातील, जगभरातील चांगले इंजिनिअनर्स मुंबईत यायलाच हवेत. पण स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरून लोकांना आणणं योग्य नाही. महाराष्ट्रातील रोजगार बाहेर जाता कामा नये, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -