घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात ३५ ते ४० कोटींचा खर्च, हे हास्यास्पद... आदित्य ठाकरेंचा...

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात ३५ ते ४० कोटींचा खर्च, हे हास्यास्पद… आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम चार दिवसांचा होता. या कार्यक्रमावरील अंदाजे खर्च ३५ ते ४० कोटींच्या घरात आहे. यापेक्षाही अधिक खर्च असू शकतो. कारण तिकडे त्यांचा सर्व मित्रपरिवारही गेला होता. परंतु हे सर्व होत असताना चार दिवसांचा खर्च जर ३५ ते ४० कोटी होत असेल तर एका दिवसाचा खर्च ७.५ ते १० कोटींच्या घरात आहे. याचाच अर्थ त्यांनी १० कोटींचा खर्च प्रत्येक दिवसाला केला आहे, असा हल्लाबोल युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या दावोस दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये खर्च दाखवणे हे योग्यरितीने त्यांना माहिती आहे. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दावोसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. साधारणपणे २ ते २.५ कोटींचा खर्च झाला असेल. हा देखील संपूर्ण खर्च राज्यावरच आला आहे. माझा आक्षेप या चार्टर्ड विमानावर नाही. परंतु तुम्ही जेव्हा कमर्शियल विमान सोडून चार्टर्ड विमानाचा वापर करता तेव्हा त्याचा उपयोग वेळेवर पोहोचण्यासाठी करता की उशीरा पोहोचण्यासाठी करता?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

हा प्रकार नक्की काय?

- Advertisement -

२२ मे २०२२ रोजी आम्ही आमच्या पेव्हेलियनचं उद्घाटन सकाळी ८.३० वाजता केलं होतं. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा त्यांनी उद्घाटन पहिल्याच दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास केलं. दावोसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या एक ते दोन बैठका झाल्या असतील. कारण आधीच्या बैठका त्यांच्या रद्द झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बैठकांचं शेड्यूल आम्हाला कुठेही दिसलेलं नाही. उद्योगमंत्री आणि MIDCनेही एकही ट्वीट केलेलं नाही. MIDCचे सीईओ गेले की नाही यावर देखील शंका आहे. हा प्रकार नक्की काय आहे. हा सर्व लोकांसमोर येणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईचा जोशीमठ करायला निघालेले मुख्यमंत्री

चार दिवसांत ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला. मुख्यमंत्र्यांचा दावोसमध्ये फक्त एक ते दोन बैठका झाल्या. १६ तारखेला महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी घेतल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शाश्वत विकासावर भाषण दिलं. खरं म्हणजे आरेची झाडं कापल्यानंतर आणि जंगलातून बोगदे तयार केल्यानंतर मुंबईचा जोशीमठ करायला निघालेले मुख्यमंत्री हे शाश्वत विकासावर काय बोलणार, याकडे माझी उत्सुकता आहे. हे सर्व हास्यास्पद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कंत्राटदारांना विनानिविदा कामं देण्यात आली

लोकांसमोर आणला तो म्हणजे रस्त्यांचा घोटाळा होता. मेगा टेंडर्समधून तीन ते चार गोष्टी आम्ही तुमच्यासमोर प्रामुख्याने आणत होतो. बीकेसीत मोठा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबई महापालिकेने एक पत्रक जारी केलं होतं. परंतु ते कुठेही प्रिंट करण्यात आलं नाही. त्याच्या जाहिराती देखील आल्या. कंत्राटदारांना विनानिविदा कामं देण्यात आली आहेत, असं त्या पत्रकात लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हा घोटाळा किंवा गैरवर्तन तर नाहीये ना?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेला विचारला आहे.


हेही वाचा : फडणवीसांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, काँग्रेसची खोचक टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -