घरमहाराष्ट्रसंविधान पाळले तर 40 आमदार अपात्र ठरणार, आदित्य ठाकरे यांचा विश्वास

संविधान पाळले तर 40 आमदार अपात्र ठरणार, आदित्य ठाकरे यांचा विश्वास

Subscribe

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला ज्या क्षणी न्याय मिळेल तेव्हा 40 गद्दार आमदार कायद्याप्रमाणे बाद होतील. गद्दार आमदार बाद होणे गरजेचेही आहे. जर तुम्ही संविधान पाळले तर ते अपात्र होणार म्हणजे होणारच, असा विश्वास शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

हे आमदार अपात्र ठरल्यावर चाळीस जागांवर तरी निवडणूक लागेल आणि सरकार पडेल. त्यांच्यात हिंमत असेल तर मध्यवधी निवडणूक लावू शकतील. महाराष्ट्रात लोकशाहीला संपवून हे सरकार बसले आहे. जर लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक घेणे गरजेचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

छायाचित्रकार सचिन वैद्य यांच्या ‘माझ्या नजरेतून’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य कृषी, उद्योग क्षेत्रात कोलमडत चालले आहे. तरीही सध्या धर्मा-धर्मात-जाती जातीमध्ये आणि जिल्ह्यात वाद निर्माण करायचे आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण महाराष्ट्राने या वादाला बळी पडून नये, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

मराठा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केली, असे वक्तव्य पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. याकडे लक्ष वेधले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, आता ते काही सर्व त्यांच्या हातातून निसटल्यानंतर आणि त्यांनी गद्दारी कशी आणि का केली, हे पाहिल्यानंतर मी प्रत्येक सभेत सांगितले आहे की, राज्यात जाती-जातीमध्ये वाद निर्माण करायचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

महाराष्ट्र कोलमडत चालला आहे. बदली, पोस्टिंगसाठी पैसे मागितले जात आहेत. यांचेही पैशाचे काही विषय आमच्याकडे आले आहेत. कुठे वाढवून काय टेंडर केले आहे, त्याची माहिती आमच्याकडे आली आहे. त्यावर अधिवेशनात आम्ही बोलणारच आहोत. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही सर्वांना एकत्र घेऊन जात होतो आणि महाराष्ट्राला सुवर्णकाळ दाखवला होता, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहराच्या नामांतराविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर किंवा धाराशिव नामकरण असो, आमच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला शेवटचा निर्णय होता. पण सध्याचे गद्दार लोक नामांतराचे श्रेय घेत आहेत, ते तेव्हा नव्हते. संभाजीनगर नामकरण करण्याचे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. उद्धव ठाकरे यांनी ते स्वप्न पूर्ण केले. जगाला माहिती आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तेव्हा हे गद्दार गुवाहाटीला घाबरून पळून गेले होते. आम्ही नामांतराचा निर्णय घेतला आणि आता केंद्र सरकारने तो मान्य केला आहे. हा प्रस्ताव मंजूर करताना सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन केला. त्यातून दंगली किंवा कोणत्याही धर्मात वाद निर्माण झाला नाही. हेच या गद्दारांच्या पोटात दुखत होते, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -