घरमहाराष्ट्रज्यांना सरकार चालवता येत नाही, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री; आदित्य ठाकरेंचा घणाघात

ज्यांना सरकार चालवता येत नाही, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Subscribe

राज्यात सगळा अनागोंदी कारभार सुरू आहे. ज्यांना सरकार चालवता येत नाही, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

राज्यात सध्या गद्दारांचं सरकार आहे. सरकारने ज्या काही सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या आहेत त्या केवळ होर्डिंग्जवर आहेत. शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पुरेशी मदत पोहोचलेली नाही. राज्यात सगळा अनागोंदी कारभार सुरू आहे. ज्यांना सरकार चालवता येत नाही, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.आदित्य ठाकरे मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Aditya Thackeray criticized Chief Minister Eknath Shinde saying that the chief minister who cannot run the government is working )

आदित्य ठाकरे मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. मध्य प्रदेशाच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पुतळ्याचं अनावरण ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुलनाथ यांच्या हस्ते होणार आहे.

- Advertisement -

फडणवीसांवरही डागलं टीकास्त्र

या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. कोकणात बारसू प्रकरणात महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला. इतकचं काय आता जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवरही लाठीचार्ज केला गेला. त्यावरही कोणतीही कारवाई केली गेली नाही. केवळ या प्रकरणांत फक्त IPS, IAS अधिकाऱ्यांना निलंबित केलं जाईल, पण जनरल डायर कोण हे सांगणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मागच्या वर्षी गणपतीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या गोळीबार प्रकरणावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की या प्रकरणात त्यांचचं बंदूक असूनही या गद्दार आमदाराचं साधं लायसन्सही जप्त केलं गेलं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

सोबतच त्यांनी प्रकाश सुर्वेंच्या मुलाने एका व्यवसायिकाचं अपहरण केल्याचा आरोप होता, तसं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं. त्या प्रकरणातही काहीही झालं नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गृहमंत्रालयाच्या त्रुटींवर बोट ठेवलं.

( हेही वाचा:गोळीबार, लाठीमार, अपहरण तरी कारवाई नाहीच; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -