घरमहाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रात झालेली गद्दारी कुणालाही आवडलेली नाही- आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात झालेली गद्दारी कुणालाही आवडलेली नाही- आदित्य ठाकरे

Subscribe

साधताना आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय. 'राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरूय. महाराष्ट्रात झालेली गद्दारी कुणालाही आवडलेली नाही." असं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधलाय.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झालीय. चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आता अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले मैदानात उतरले आहेत. या प्रचारसभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय. ‘राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरूय. महाराष्ट्रात झालेली गद्दारी कुणालाही आवडलेली नाही.” असं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधलाय.

भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या या चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते नाना काटे हे उमेदवार आहेत. नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज सभा होतेय. यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे आज या प्रचारसभेला संबोधित करत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

- Advertisement -

“राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे ४० गद्दार आमदार जातात तिथे ५० खोक्यांची घोषणा दिली जाते. पण त्यावर आम्ही खोक्यांना हात लावले नाहीत, असे ४० आमदारांमधील कुणी का म्हणाले नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. त्याऐवजी या घोषणा देणाऱ्याच्या मागे पोलिसांना पाठवतात. त्यांच्या घरावर धाड टाकतात. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागते. परंतु राज्यात झालेली ही गद्दारी जनतेला अजिबात आवडलेली नाही.” असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी शिंदे गटावर आरोप करत आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना कोविड झालेला असताना दोन वेळा सर्जरी झाली होती, त्यावेळी त्यांच्यावर ‘या’ गँगनं वार केले आणि आपलं सरकार पाडलं. आज महाराष्ट्रात फिरत असताना अनेक लोक मला भेटतात. माझ्या दौऱ्यावेळी लोक चौकाचौकात उभे असतात ते माझी गाडी थांबवतात आणि मला सांगतात काहीही करा पण महाविकास आघाडीचं सरकार परत आणा. आम्हाला तुमची गरज आहे, मविआची गरज आहे.” असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. “त्यांची आघाडी खुर्च्यांसाठी म्हणून त्यांच्या सभांना खुर्च्यांची गर्दी असते. आमच्या सभांना जनतेची गर्दी असते. भाजपने त्यांच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी केलेलं हे षडयंत्र आहे. हे गद्दर सरकार बदलण्याची भाषा करतात.” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाचा समाचार घेतला.

- Advertisement -

जरी आमची विचारसरणी वेगळी असली तरी लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही एकत्र आलो. आम्हाला सत्तेची कुठलीही हाव नव्हती. मविआची सत्ता ही राज्यातील जनतेची होती. काही भाजप पुरस्कृत गद्दार सरकारने महाराष्ट्र प्रगती करत असल्याने राज्याची प्रगती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठित 40 वार केले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -