पवारांप्रमाणेच आदित्य यांचीही पश्चिम महाराष्ट्रात पावसात सभा, शिदे गटावर हल्लाबोल

AADITYA THAKRE_KOLHAPUR

राज्यात सत्तातर झाल्यानंतर आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोमवारी त्यांनी आजर, कोल्हापूर व जयसिंगपूर येथे जाहीर सभा घेत बंडखोर आमदार व खासदारांवर टीका केली. शहरातील मिरजकर तिकटी येथे पावसात झालेल्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या गर्दीत त्यांच्याशी संवाद साधला. या सभेत सीमाभागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी माणुसकी आणि विश्वासाच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात आलेले नवीन सरकार हे बेकायदेशील, बेईमानी आणि गद्दारांचे असून, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा विश्वास व्यक्त केला.

त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला  –

यावेळी ज्यांना आम्ही गरजेपेक्षा जास्त आणि लायकीपेक्षा अधिक प्रेम दिले, विश्वास दिला; त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे त्या ४० आमदार आणि १२ खासदारांची ओळख ही गद्दार म्हणूनच कायम राहील. आम्ही राजकारण न करता समाजकारण करत बसल्यानेच त्यांनी आमच्याशी राजकारण केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना हे गद्दार आमदार, खासदार विकत घेत होते, रुग्णालयातील आजारी माणसाला विश्वास देण्याऐवजी त्यांचा विश्वासघात केला, याचे फार वाईट वाटते, अशी टीका त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली.

राज्यपालांवर टीका –

देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही, असा सवाल करताना ठाकरे म्हणाले, आमची लढाई ही सत्ता आणि सत्य यांच्यात सुरू आहे. राज्यात आतापर्यंत अनेक राज्यपाल पाहिले. मात्र, सध्यासारखा राजकीय राज्यपाल पाहिला नाही. जो मुंबईतील मराठी माणसाला कमी लेखतो, मराठी माणसाला आणि शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यावर टीका करतो, असी टीका राज्यपालांवर केली.

या वेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील उपस्थित होते.

पावसातील सभा –

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हपूरमध्ये  मिरजकर तिकटी येथे पावसा सभा घेतली. यावेळी शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण उपस्थितांना झाली. 2019 प्रमाणेच शिवसेना या सभेनंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या होत्या. आदित्य ठाकरेंच्या सभेमुळे शिवसेनेला बळकटी मिळेल का अशी चर्चा यामुळे सुरू झाली.