काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे सदैव खुले, आदित्य ठाकरेंकडून काश्मीरच्या घटनांवर चिंता व्यक्त

जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अद्याप सुधारली नाही. जे काही तिथे होतंय तसेच ज्या घटना समोर येत आहेत. त्या चांगल्या नाहीत. निवडणुका येतात आणि जातात परंतु काश्मिरी पंडितांचा विषय महत्त्वाचा असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray express concern over Kashmir incidents said Maharashtra's doors always open for Kashmiri Pandits
काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे सदैव खुले, आदित्य ठाकरेंकडून काश्मीरच्या घटनांवर चिंता व्यक्त

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या हत्येबाबत आणि तेथील एकूणच घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. काश्मिरी पंडितांनी खोरे खाली करुन स्थलांतर केलं आहे. यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे सदैव खुले आहेत. आम्ही काश्मिरी पंडितांसोबत असल्याचे सांगितले आहे. काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काश्मीरच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त केली आहे. तेथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आता पुन्हा परिस्थितीची पुनरावृत्ती होणं दुर्दैवी आहे. आम्हाला आशा आहे की, मोदी सरकार काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलेल. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अद्याप सुधारली नाही. जे काही तिथे होतंय तसेच ज्या घटना समोर येत आहेत. त्या चांगल्या नाहीत. निवडणुका येतात आणि जातात परंतु काश्मिरी पंडितांचा विषय महत्त्वाचा असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

यापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काश्मीर खोऱ्यात हिंदू आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्याच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. शिवसेना पक्ष प्रमुख म्हणाले की, काश्मिरी पंडित खोऱ्यातून पळून जात आहेत. त्यांना मायदेशी परतण्याचे स्वप्न दाखवण्यात आले, मात्र त्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात आहे. पंडितांचे पलायन ही धक्कादायक घटना आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाही काश्मिरी पंडितांना पाठिंबा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा यापूर्वी काश्मिरी पंडितांसोबत खंबीर उभा असल्याची ग्वाही दिली आहे. महाराष्ट्रा त्यांच्या पाठिशी सदैव खंबीर उभा आहे. तसेच यापूर्वी 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील काश्मिरी पंडितांच्या मुलांना शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले होते. राज्य सरकार काश्मिरी पंडित नेत्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल असेही बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते.


हेही वाचा : Corona Virus : मास्क सक्ती नाही तर मास्क वापरण्यासाठी आवाहन करतोय : अजित पवार