घरताज्या घडामोडीMamata Banerjee Mumbai Visit : ममतादीदींनी मुख्यमंत्र्यांना दिला शुभसंदेश, आदित्य ठाकरे यांची...

Mamata Banerjee Mumbai Visit : ममतादीदींनी मुख्यमंत्र्यांना दिला शुभसंदेश, आदित्य ठाकरे यांची माहिती

Subscribe

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. ममतादीदींनी मुख्यमंत्र्यांना शुभसंदेश दिला असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधील बैठक पार पडल्यानंर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ममता दीदी आज मुंबईत आल्या आहेत. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी देखील त्या मुंबईत आल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक वेगळं नातं आहे. नेहमीचं दोघांमध्ये कोविडच्या काळात आणि इतर राजकीय गोष्टींमध्ये सहकार्य राहिलेलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ममता दीदींना भेटायचं होतं. परंतु बायो बबलमध्ये असल्यामुळे त्या भेटू शकल्या नाहीत. त्यामुळे मी आज ममता दीदींना भेटायला आलो आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्यासोबत बऱ्याच विषयांवर चर्चा देखील झाली. मात्र, राजकीय गोष्टींवर किंवा विषयांवर कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्या मुंबईत दाखल झाल्या. सिद्धिविनायक मंदिरात भेट दिल्यानंतर ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.


हेही वाचा: Mamata Banerjee Mumbai Visit : मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -