आदित्य ठाकरे ‘त्या’ शिवसैनिकाला न भेटताच निघून गेले

शिंदे गटाच्या विरोधात जहाल आंदोलन करणाऱ्या बाळा कोकणे यांच्यावर सोमवारी रात्री झाला होता प्राणघातक हल्ला

नाशिक : निलेश उर्फ बाळा कोकणे हे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कट्टर आणि डॅशिंग शिवसैनिक म्हणून शहरात परिचित आहेत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लागलेल्या पोस्टरला काळ फासने, बंडखोरांची अंत्ययात्रा काढणे आणि सुहास कांदे यांच्या कार्यलयावर निदर्शन करण्याच्या नियोजनात कोकणे अग्रेसर होते. त्यांच्यावर सोमवारी (दि. १८) रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना रुग्णालयात त्यांची भेट घेतील अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती मात्र आदित्य यांनी फोन वर विचारपूस करण्याचा सोपस्कार पार पाडून ते निघून गेले. यामुळे शिवसैनिक संभ्रमात सापडले आहेत.

जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतर नाशिक शहरात शिंदे समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ काही पोस्टर लावले. याबाबत शिंदे यांच्याशी थेट शत्रुत्वाची भूमिका घेत त्यांच्या समर्थनार्थ लागलेल्या पोस्टरला काळ फसण्यासाठी पुढाकार घेण्याच, निषेध नोंदवण्यात धाडस कोकणे यांनी दाखवलं होत. यानंतर सुहास कांदे यांच नाशिक शहरातील कार्यलयावर निदर्शन करण्यासाठी सज्ज झालेल्या आणि ज्या काही शिवसैनिकात हे धाडस होते अश्याच्या अग्रभागीही कोकणे हेच होते. पोलिस प्रशासनाची सतर्कता, पहारा यामुळे कांदे यांच्या कार्यलयावर असे काही घडले नाही, परंतु त्यावरून कोकणे आणि कांदे समर्थकांची फोनवरून चकमकही झाली असेही वृत्त होते.

दरम्यान, मागील काही दिवसातील या सर्व घडामोडीनंतर महात्मा गांधी रोड भागातील यशवंत व्यायामशाळेनजीक बाळा कोकणे यांच्यावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी मागून वार केले. यामुळे शहरात अनेक चर्चांना उधाण आले होते.

अश्यातच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी (दि. २१) शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मुक्कामी असताना कोकणे यांची भेट घेतली अशी अपेक्षा होती. मागील आठवड्यात मुंबईतील भायखळा परिसरात एका शिवसैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या शिवसैनिकांची घेतली होती. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेही नाशिकच्या या शिवसैनिकांची भेट घेत त्याला बळ देतील अशी अपेक्षा होती. मात्र फोनवरून विचारपूरस करण्याचा सोपस्कार पार पाडून आदित्य आपल्या पुढच्या दौऱ्याला रवाना झाल्याने स्थानिक शिवसैनिक बुचकळ्यात पडले आहेत.

खरंतर कोणत्याही पक्षाच बलस्थान आणि कणा हा त्यांच्या शेवटचा कार्यकर्ता असतो. पक्षाच्या वाईट काळात तो कार्यकर्ता आवर्जून पक्षासोबत अधिक निष्ठतेने उभा राहतो. पक्षासाठी आपल्या कुटुंब, घराकडे दुर्लक्ष करून जीवाची बाजी लावून लढतो. अशीच कृती कोकणे यांनी कायम केली आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या नेत्याने त्यांना आधार देणं. त्यांचं सांत्वन करून त्यांना बळ देण्याची अपेक्षा होती. मात्र तस घडलेलं नाही.