घरताज्या घडामोडीAditya Thackeray : अयोध्येपूर्वी आदित्य ठाकरेंचा दिल्ली दौरा, राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता

Aditya Thackeray : अयोध्येपूर्वी आदित्य ठाकरेंचा दिल्ली दौरा, राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता

Subscribe

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यापूर्वी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीतील दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. राज्यात सुरु असलेल्या मशिदींच्या भोंग्यांवरील प्रश्नावर आदित्य ठाकरे केंद्रातील नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. लाऊड स्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होते तसेच लाऊड स्पीकरचा डेसिबल हा पर्यावरण विभागाकडून ठरवण्यात येतो यामुळे केंद्रीय पर्यावरण विभागातील मंत्र्यांशी आदित्य ठाकरे चर्चा करु शकतात. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील आणखी मंत्री जाण्याची शक्यता आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे. शासकीय दौरा असून अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी आदित्य ठाकरे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा असून याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आदित्य ठाकरे कोणत्या-कोणत्या नेत्यांच्या भेटी घेतील याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तसेच दिल्लीत होणाऱ्या परिषदांमध्येही अदित्य ठाकरे सहभागी होतील.

- Advertisement -

भोंग्यांच्या विषयावर केंद्राशी चर्चा करणार

राज्यातील मशिदींवरील भोंग्यांसदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते. दरम्यान ध्वनी प्रदुषण आणि कायदा सुव्यवस्था या दोघांचा समतोल राखून पुढील कारवाई कशी करायची यावर विचार सुरु आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्यामुळे केंद्र सरकारकडे काही चर्चा करु, इतर राज्यात काय सुरु आहे. देशातील आढावा घेऊ आणि योग्य ती कारवाई करुन आम्ही काही मार्गदर्शक सूचना काढू असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे केंद्रातील मंत्र्यांशी आदित्य ठाकरे चर्चा करण्याची शक्यता आहे.

सोमय्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे दिल्लीत

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले होते. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती गृहसचिवांना आणि गृहराज्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. राज्यातील शिवसेना-भाजप संघर्ष आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. सोमय्यांनी मंगळवारी दिल्ली दौरा केला यानंतर आता दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या इशार्‍याने मुंबईत हिंसाचार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -