घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंची तब्येत बिघडली, शिवसंवादच्या तिसऱ्या टप्प्यातील दौरा रद्द

आदित्य ठाकरेंची तब्येत बिघडली, शिवसंवादच्या तिसऱ्या टप्प्यातील दौरा रद्द

Subscribe

शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा ९ आणि १० ऑगस्ट रोजी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीणमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांचा हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.

मुंबई – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shivsanwad Yatra) सुरू असून या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे जळगाव आणि नाशिकच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आजारी असल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा – धनुष्यबाण नक्की कोणाचा? निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दोघांचीही पाठ

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यभरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा ९ आणि १० ऑगस्ट रोजी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीणमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांचा हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! आशिष शेलार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार?, चंद्रकांतदादा कॅबिनेटमध्ये

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची कोरोना चाचणी केली असता ती निगेटीव्ह आली आहे. दौरा तात्पुरता रद्द करण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडीकरांची दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -