महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

shiv sena aditya thackeray reaction on cm eknath shinde over 50 crore box in mumbai

महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत प्रोजेक्टने आपला मोर्चा गुजरातला वळवला आहे. राज्यातील खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच वेदांत प्रोजेक्ट गुजरातला वळाला असं स्पष्ट होतं. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. पिस्तुल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला सुनावलं.

वेदांतचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात स्थापन न करता गुजरातला जाणार असल्याच्या बातमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेदांतचा प्रोजेक्ट आहे तो गुजरातला गेलेला आहे. वेदांत आणि आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणं हे चांगलच आहे. तरी देखील या प्रोजेक्टसाठी एक वर्षात अनेक बैठका घेऊन अनेक भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रोजेक्ट येईल अशी काळजी घेऊन आम्ही काम करत होतो. तेच पुढे नेत असताना मागच्या महिन्यात आम्ही बघितलं की या खोके सरकारने देखील आमच्याच कामावर पुढे केलेलं आणि महाराष्ट्राला आश्वासन केलेलं की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार आहे. तरीदेखील आज ही बातमी वाचून थोडा धक्का बसला आहे की हा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे.

कोणत्याही ही राज्यात गेले त्याचे दुःख नाही तरी देखील आपल्या राज्यात आलं कसं नाही हा प्रोजेक्ट हे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून महाविकास आघाडी सरकारने एवढं सगळं पाठबळ देऊन हा प्रोजेक्ट इथ आला नाही. याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. आज आपण बघत आहात की खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे. प्रशासनावर असेल, कायदा सुव्यवस्थेवर असेल कोणाचा अंकुश दिसत नाही आहे म्हणून या गोष्टी होत आहेत. माझी हीच विनंती राहील खोके सरकारला थोडं पिस्तूल काढणं, धक्काबुक्की करण खोके गुंड गर्दीची भाषा करणं सोडून द्यावं आणि मोठ्या इंडस्ट्रीजना आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.


हेही वाचा : …तर बापाच्या जागी बाळासाहेबांचं नाव लावा, बंडखोर आमदारांना भास्कर जाधव यांचं आव्हान