गद्दारांच्या मागण्या पुरविण्यात मुख्यमंत्र्यांचा वेळ जातोय; शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही; आदित्य ठाकरेंचा टोला

ज्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का आहे त्यांच्या संदर्भात मी काही बोलू इच्छित नाही, त्यापेक्षा जनतेची कामे करून जनतेचा आवाज बुलंद करायचा हेच आमचं काम आहे आणि तेच आम्ही करत राहू

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांच्या शिंदे गटातील मंत्री आणि आमदार आज गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. अशातच मुंबई मधील बोरिवली येथे असलेल्या चोगले हायस्कुल मध्ये युवासेनेचा रोजगार मेळावा होता त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे त्यांच्या शिंदे गटातील आमदारांसोबत गुवाहाटीला गेले त्यावरून आदित्य ठाकरे म्हणाले, सर्वांनाच पहिल्या दिवसापासून माहित होते की त्यांचा रस हा राक्षसी महत्वाकांक्षा एवढाच होता. राज्याला पुढे न्यायाचे, राज्याचे भले करायचे, जनतेचे काम करायचे हे कधीच त्यांच्या मनात नव्हते आणि हे आज पुन्हा दिसून आले. गद्दारांच्या मागण्या पुरविण्यात मुख्यमंत्र्यांचा वेळ जातोय त्यांच्या कडे जनतेची कामे करायला वेळ नाही. असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला. कोणतेही विधान करायचे आणि जनतेचे लक्ष ओला दुष्काळ आणि सीमाप्रश्नावरून हटविण्याचे काम हे सरकार करत आहे तर चालणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील काही आमदार नाराज असून ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला गेले नाहीत अशा चर्चा सुद्धा आहेत त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का आहे त्यांच्या संदर्भात मी काही बोलू इच्छित नाही, त्यापेक्षा जनतेची कामे करून जनतेचा आवाज बुलंद करायचा हेच आमचं काम आहे आणि तेच आम्ही करत राहू असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील नाराज आमदारांवर बोलणे टाळणे.

अनेक महिने झाले तरीही शिंदे सरकार मधील मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. हे सरकार पडेल पण तरीही मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. म्ह्णून कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या विमानाने हे कुठे कुठे जात आहेत असा टोला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावला.

सोबतच बाबा रामदेव यांनी महिलांबद्दल जे वक्तव्य केले त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले. बाबा रामदेव यांनी जे वक्तव्य केले ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. बाबा रामदेव जे बोलले ते दुःख देणारे होते. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हाच प्रश्न उरतो. असेही आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर हे राज्यपाल राजकीय राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्रद्वेषी असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.


हे ही वाचा – महाराष्ट्रात सध्या सरकार कुठे आहे? राऊतांचा सवाल