Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी गोधडी शब्दाचा वापर हा..,आदित्य ठाकरेंचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

गोधडी शब्दाचा वापर हा..,आदित्य ठाकरेंचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

Subscribe

32 वर्षांचा पोरगा आमच्यावर टीका करतोय. तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीत नव्हते तेव्हा मी शिवसेनेत होतो, असा हल्लाबोल शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला होता. यालाच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात गोधडी शब्दाचा वापर केला होता. तेच हे कॉपी करत आहे. एकच प्रश्न आहे, 32 वर्षांच्या तरुणाने प्रश्न विचारायचे नाही का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज गणपती दर्शनासाठी नवीमुंबई ,पनवेलमध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटलांवर टीका केली. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात गोधडी शब्दाचा वापर केला होता. तेच हे कॉपी करत आहेत. एकच प्रश्न आहे, 32 वर्षांच्या तरुणाने प्रश्न विचारायचे नाही का, माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला, शिवसेना का फोडली हे विचारायचं नाही का, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

चांगला माणूस मुख्यमंत्री झाला होता, त्याला पायउतार का करायला लावले हे आम्ही विचारायचं नाही का, 50 खोक्याचे काय झाले हे विचारू नये का, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले होते पाटील?

- Advertisement -

आदित्य ठाकरेंवर आमचा मुळीच बोलण्याचा अधिकार नाही. कारण आम्हाला बाळासाहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी मोठं केलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोण आहेत?, तुम्ही गद्दार आहात असं बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे. 32 वर्षांचा पोरगा आमच्यावर टीका करतोय. तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीत नव्हते तेव्हा मी शिवसेनेत होतो, असा हल्लाबोल शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला होता.


हेही वाचा : कोण आदित्य ठाकरे?, 32 वर्षांचा पोरगा आमच्यावर टीका करतोय; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -