घरताज्या घडामोडीNanar Refinery : स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प होईल, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Nanar Refinery : स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प होईल, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Subscribe

नाणार प्रकल्प बारसूला हलवण्याबाबत राज्य सरकारचा विचार आहे. बारसूतील स्थानिक नागरिकांचाही या प्रकल्पाला विरोध आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन रिफायनरी प्रकल्प होणार असल्याची प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रत्नागिरीतील स्थानिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेत नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. यावेळी हा प्रकल्प दुसऱ्या जागी करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन कसे पुढे जाता येईल याचा विचार करुनच पुढचा निर्णय घेण्यात येईल असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमंशी संवाद साधताना नाणार रिफायनरीबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे म्हटलं आहे. प्रकल्प दुसऱ्या जागी करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आजही चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, जेव्हा आपण प्रकल्प आणत असतो तेव्हा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन काही गोष्टी केल्या पाहिजेत. कुठेही काहीही त्यांना वाटले इकडे नको दुसरीकडे करण्यात यावा, जसा नाणारमधून प्रकल्प बाहेर केलाय त्यामुळे नाणारमध्ये रिफायनरी होणार नाही. दुसरीकडे जागा मागितली आहे. स्थानिक भूमिपुत्रांचे न्याय हक्क कसे आबाधित राहतील त्यांना विश्वासात कसं घेता येईल याचा विचार करुन पुढे जाऊ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

रिफायनरीसाठी एक जागा पाहिली आहे. अजून १-२ जागा आहेत. पण हे सगळ होत असताना प्रकल्पासाठी दोन ते तीन गरजा असतात त्यातील एक पाण्याची आणि इतर गरजा आहेत. स्थानिक भूमिपुत्रांचे न्याय हक्क हे दोन्ही सांभाळून त्यांना विश्वासात घेऊन पुढे जण्यावर काम करणार आहे. जागा उपलब्ध करुन देताना स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा करणं गरजेचे आहे. ते देखील आम्ही करणार आहोत असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

नाणारला स्थानिकांचा विरोध होता. जिथे जिथे लोकांचा विरोध असेल त्यांना विश्वासात घेऊन काम करणं गरजेचे आहे. काल तिकडच्या जागेची पाहणी केली. तिकडच्या झाडांची कत्तल करण्यात आली होती. तिकडची जागा खूप घेण्यात आली होती. तसेच बाहेरच्या लोकांनी जागा घेतली आहे. स्थानिकांची जागा नाही आहे. यामुळे प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही. दुसरीकडे जागा पाहिली आहे. तिकडे कमी घर असतील तसेच झाडं जास्त नाही अशी जागा मिळाली आहे. तिकडच्या स्थानिकांचा पाठिंबा असेल आणि विरोधही असेल त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन काम करावे लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार रिफायनरीसाठी बारसूचा प्रस्ताव, राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -