Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार - आदित्य ठाकरे

वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार – आदित्य ठाकरे

Subscribe

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीत होत असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभेवरून जोरदार हल्ला चढवला. वरळीत त्यांना गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे, तरी विजय आपलाच होणार आहे. कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीत होत असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभेवरून जोरदार हल्ला चढवला. वरळीत त्यांना गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे, तरी विजय आपलाच होणार आहे. कितीही नेते येऊदे वरळीत विजय आपलाच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात कोणाचा विजय होणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. (Aditya Thackeray Slams Cm Eknath Shinde On Worli Tour Mumbai)

आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नाशिकच्या चांदोरी येथे आजोजित सभेत ते बोलत होते. पाठीवर वार करुन मला विरोधी पक्षात बसवले. वरळीतून लढणे जमत नव्हते तर, मला फोन करुन सांगायचे, मी ठाण्यात येऊन लढलो असतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

- Advertisement -

“मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांशी जाता येत नाही. बुरा वक्त आया है, वो भी जायेगा. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा खोके वाटले जातात पण तरीही खुर्च्या रिकाम्या असतात. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा क्सिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात. दुःख याचं नाही की उद्योग बाहेर गेले. पण राजकीय अस्थिरत्यामुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

“माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. आशीर्वाद तुम्ही मला द्या. गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता बोलता तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल. पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे

दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटाने तयारीला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे आदित्य ठाकरे यांचे बंधू निहार ठाकरे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे होणार लढत; शिंदे गटाकडून तयारीला सुरुवात

- Advertisment -