दगाफटका केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना परत येण्याचं आवाहन – आदित्य ठाकरे

aditya thackeray

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे मेळावे घेत शिंदे गटाला एकप्रकारे आव्हान दिलं जात आहे. दगाफटका केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

…मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना परत येण्याचं आवाहन 

कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सर्व काही सुरळीत चालू असताना या बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दगा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोर आमदारांनी दगाफटका केला असला तरीही उद्धव ठाकरेंनी आपलं मन मोठं करत त्यांना मुंबईत परत येण्याचं आणि यावर तोडगा काढण्यासाठी आवाहन केलं आहे.

जनतेची कामं अदयापही थांबलेली नाहीयेत

राज्य सरकार महत्त्वाच्या गोष्टींवर काम करत आहे. पीकपाणी, कोविड, पाणी टंचाई या गोष्टींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व काम करत आहोत. राज्यात राजकीय घडामोडी जरी सुरू असल्या तरीदेखील जनतेची कामं अदयापही थांबलेली नाहीयेत. बैठकीत ज्या पद्धतीने विषय किंवा प्रस्ताव मांडण्यात आले. त्यासंदर्भात मी काहीही बोलू शकत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

देशात लोकशाही आहे की नाही?

या राजकीय घडामोडींनतर देशात लोकशाही आहे की नाही, याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जे आमचे आमदार गुहावाटीत अडकले आहेत, त्यांना मुंबईत येण्याची मुभा देण्यात यावी. त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत.


हेही वाचा : बंडखोर आमदार मुंबईत येईपर्यंत आम्ही काय बोलणार? – पालकमंत्री अस्लम शेख