घरताज्या घडामोडीप्राण जाये पर वचन ना जाये, हेच आमचे हिंदुत्व - पर्यावरण मंत्री...

प्राण जाये पर वचन ना जाये, हेच आमचे हिंदुत्व – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Subscribe

नांदेडजवळ उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारतीचे भुमीपूजन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून टिका करणाऱ्या भाजपसह विरोधकांनाही टोला लगावला आहे. प्राण जाये पर वचन ना जाये, हेच आमचे हिंदुत्व, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, रघुकूल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये, हेच आमचे हिंदुत्व, असं ठणकावून सांगून आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. हे राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे मी राजकीय बोलणार नाही, जेव्हा राजकीय सभा होतील तेव्हा बोलेनच. पण सध्या काहीजण आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, पण त्याची आम्हाला गरज नाही, असे सांगत रघुकूल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये हेच आमचे हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार करत असलेल्या विकास कामांची माहिती देत खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहा, नवा महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न आपण वेगाने पुर्ण करू असे आश्वासन देखील यावेळी दिले. गेली दोन-अडीच वर्षही कोरोनामुळे वाया गेली, पण याही काळात आपण विकासकामांना कुठेही ब्रेक लागू दिला नाही. रस्ते, पूल ही कामे सातत्याने सुरूच आहेत, असं ठाकरे म्हणाले.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला निर्णय रायगडाच्या संवर्धनासाठी सहाशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे दिलेले वचन पाळले आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. कोरोनामुळे त्याची प्रसिद्धी करता आली नाही, परंतु शेतकऱ्यांना दिलेले वचन आपण पाळले, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Asani Cyclone : ओडिसा-आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार असनी चक्रीवादळ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -