२ दिवसांत आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

aditya thackeray forest tourisam

नाशिकमधील त्र्यंबकेश्वराच्या खरशेत येथील आदिवासी महिलांना ३० फूट खोल तास बल्ल्यांवरून रोज पिण्याच्या पिण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तसेच यासंबंधीत व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रांमधून झळकल्यानंतर ही बातमी वाचून मी अवस्थ झालो, अशा प्रकारचं ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तसेच पुढील २ दिवसांत हे काम पूर्ण करून आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू, असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

पाण्यासाठी आदिवासी महिलांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो ही बातमी वाचून अस्वस्थ झालो. येथील स्थानिकांशी बोलून महिलांच्या सोयीसाठी येथे ताबडतोब लोखंडी साकव बांधण्याचे काम सुरू झाले आहे. २ दिवसात हे काम पूर्ण करून आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

लोखंडी साकव बसवण्याचे काम सुरू

महिलांची जीवघेण्या कसरतीतून कायमची मुक्तता करा, असा आदेश आदित्य ठाकरे यांनी युवी सेनेच्या पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिला आहे. आदित्य ठाकरेंनी दखल घेतल्यानंतर स्थानिक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून येथे लोखंडी साकव बसवण्याचे काम सुरू केले. ३० फूट लांब आणि ४ फूट रूंद या आकाराचा साकव बसवण्यात येत आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार असून आदिवासी महिलांचा त्रास कायमचा नाहीसा होणार असल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.


हेही वाचा : Corona Positive : सुप्रीम कोर्टाच्या ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण, १५० कर्मचारी क्वारंटाईन