घरताज्या घडामोडीरस्त्यांच्या काँक्रिटीकरणावरून आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे सरकार

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावरून आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे सरकार

Subscribe

मुंबई आणि महाराष्ट्राला लुटणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नागपूरमध्ये आम्ही एनआयटी आणि अनेक घोटाळ्यांबाबत वक्तव्य केलं. परंतु त्यासंदर्भात कुठेही कारवाई झाली नाही. निर्लज्जपणे हा सर्व कारभार केला जात आहे. मुंबई महानगरपालिकेची लूट ही खोके सरकारने करायला सुरु केली आहे. ऑगस्ट महिन्यात खोके सरकारने ५ कोटींची रस्त्यांची कामं काढली होती. त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेवटी हे टेंडर रद्द करण्याची वेळ आली, असं म्हणत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुंबईबद्दल आपण अनेक विषय मांडले आहेत. साधारणपणे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे टेंडर काढण्यात आले होते. ६ हजार ८० कोटी एवढे मोठे टेंडर काढण्यात आले आहेत. मुंबईत अंतर्गत ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तीन वर्षात ६ हजार कोटींची कंत्राट काढणं अपेक्षित होती, ती एका वर्षासाठी काढण्यात आली. १ ऑक्टोबर ते ३१ मे हा मुंबईत काम करण्यासाठीचा योग्य वेळ आहे. परंतु आता त्यांनी कामाचे आदेश दिले तर पावसाळ्याआधी ही कामे होतील की नाही, हे सांगू शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतील रस्त्यांची कामे कशी केली जातात, हेच माहित नाही. कामाची समज नसताना टेंडर काढून ठेवली आहेत. महापौर, लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांना टेंडर काढण्याचा अधिकार कुणी दिला?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

- Advertisement -

मुंबईतील कुठलंही टेंडर हे इतर राज्यापेक्षा, शहरापेक्षा जास्त असते. ४०० किलोमीटरचे रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास होत आहे. टेंडरचे पैसे नागरिकांच्या खिशातून दिले जाते. सिमेंट काँक्रीटचे रस्ते रद्द करा, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. मुंबईचा एटीएमसारखा वापर केला जात आहे. मुंबईला विकून नका, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी २२५ कोटींचं टेंडर महापालिकेला काढायला सांगितलं होतं. फिल्म सिटी ही महापालिकेच्या अखत्यारित नसून ही पूर्णपणे वेगळी संस्था आहे, असं महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं. हे मुंबई किंवा बीएमसीच्या पैशातून होऊ शकत नाही. कारण ती संस्था वेगळी आहे. त्यामुळे अजूनही त्या टेंडरचा काय झालंय हे कोणालाच माहिती नाही.

- Advertisement -

गेल्या सहा महिन्यांत जणू काही मोगलाई आपल्या राज्यात आली आहे. ज्या मतदार संघात आपण बसलो आहोत. तिकडच्या स्थानिक आणि गद्दार आमदारांनी गणेशोत्सवात मिरवणुकीच्या वेळी बंदूक बाहेर काढली. पोलीस स्टेशनमध्येही गोळीबार केला. त्यांच्याच बंदुकीमधून त्यांनी गोळी चालवल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाहीये. असे अनेक प्रकारचे प्रसंग या गद्दार आमदारांकडून महाराष्ट्रात झालेले आहेत. पण त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सहा महिन्यांत अधिवेशन असो किंवा इतर काही आम्ही शेतकऱ्यांना मदत करा असं सांगत असतो. ओला दुष्काळ जाहीर करा असंही सांगत असतो. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहीजे, असंही सांगत असतो. पण स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके याच धोरणावर हे खोके सरकार पुढे जात आहे. तिसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करूनही राज्यपालांना कुठेही बदलण्यात आलेलं नाहीये. उलट त्यांना वाचवण्याचा प्रयत्न खोके सरकार करत आहे, असंही ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -