घरमहाराष्ट्रराज्यात मुख्यमंत्री कोण हे देवालाच माहीत, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

राज्यात मुख्यमंत्री कोण हे देवालाच माहीत, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

Subscribe

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यापासून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अॅक्शन मोडवर आले आहेत. बंड केलेल्या आमदारांवर त्यांनी नेहमीच निशाणा साधला आहे. तर, आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरच हल्लाबोल चढवला. राज्यात मुख्यमंत्री कोण हे देवालाच माहित असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच, खोके सरकार निवडणूक घ्यायला घाबरत आहे. नाहीतर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे गेले असते, असाही टोला ठाकरेंनी लगावला. स्वरगंधार आणि मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या द रिव्हर फेस्ट कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते.

हेही वाचा -ठाकरेंचं शिंदे-फडणवीस सरकारपेक्षा एक पाऊल पुढे, दानवे आणि आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

- Advertisement -

मुंबईभर शिंदे गटाने बॅनर लावले आहेत. बॅनरबाजी करून लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गद्दारांनी मुंबईत एवढे बॅनर लावले आहेत की मळमळायला लागले आहे. अंत असतो होर्डींग लावायलाही. होर्डिंग्जसाठी एवढे पैसे आले कुठून? बेस्टचे खरंच एवढे स्पॉट त्यांनी खरेदी केले असतील तर, एवढे पैसे कुठून आले असा सवालही ठाकरेंनी केला.

दरम्यान, ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद केल्याची बातमी पसरली होती. मात्र, ही बातमी खोटी असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. ते म्हणाले की, बातमीच्या सोर्सवर विश्वास ठेवू नका. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले की, विस्तार करणार तर काय करणार, जे नाराज आहेत जे आमचे झाले नाहीत ते त्यांचे काय होणार?

- Advertisement -

हेही वाचा – जग काय विचार करतं याने फरक पडत नाही, प्रियंका गांधींची सोनियांसाठी भावूक पोस्ट

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -