घरताज्या घडामोडीमाझ्या गुरुंसोबत, सदैव! आदित्य ठाकरेंनी शेअर केला वडील-आजोबांसोबतचा जुना फोटो

माझ्या गुरुंसोबत, सदैव! आदित्य ठाकरेंनी शेअर केला वडील-आजोबांसोबतचा जुना फोटो

Subscribe

आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने शिवसेनेतील युवा नेता आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबा आणि वडिलांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य रंगलं आहे.

आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेतील युवानेता आदित्य ठाकरे यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह फोटो शेअर केला आहे. माझ्या गुरुंसोबत, सदैव! असं कॅप्शन टाकत त्यांनी आपल्या आजोबा आणि वडिलांना मानवंदना दिली आहे. (Aditya Thackeray tweet on guru by sharing balasaheb thackeraya and uddhav thackeray photo)

हेही वाचा – गुरुपौर्णिमा : ‘गुरूर’ भी वो ही…, संजय राऊत यांचे बाळासाहेबांना अभिवादन

- Advertisement -

आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने शिवसेनेतील युवा नेता आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबा आणि वडिलांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य रंगलं आहे. यामध्ये शिवसेनेला खूप मोठ्या बंडाचा सामना करावा लागला. तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उठाव करून शिवसेनेत नवा गट स्थापन केला. हा दुसरा गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. दरम्यान, शिंदे गटाचा हा दावा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह अनेक शिवसैनिकांनी खोडून काढला आहे.


बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडून सत्ता स्थापन केल्यानंतरही रोज कोणी-ना- कोणी शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटात सामील होत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. तर, कालच कट्टर शिवसैनिक शीतल म्हात्रे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे हळूहळू सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला सोडून शिंदे गटाला आपलंसं करत असल्याने आपण मात्र सदैव आपल्या गुरुंसोबतच राहणार असल्याचं सूचक कॅप्शन आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंनी केले शिवसेनाप्रमुखांना स्मरण

आज सकाळपासूनच गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक नेत्यांनी आपल्या गुरुंप्रती भावना व्यक्त केल्या आहे. संजय राऊतांसह अनेकांनी मानवंदना दिली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन मानवंदना दिली. असं असताना आदित्य ठाकरे यांनी मात्र उशिराने गुरुपौर्णिमेबाबत ट्विट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -