घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडॅमेज कंट्रोलसाठी थेट आदित्य ठाकरेंना केले नाशकात पाचारण; देवळालीत सभेचे आयोजन

डॅमेज कंट्रोलसाठी थेट आदित्य ठाकरेंना केले नाशकात पाचारण; देवळालीत सभेचे आयोजन

Subscribe

नाशिक : नाशिकमध्ये ठाकरे गटाला नाशिकमध्ये गळती लागल्यानंतर खा.संजय राऊत यांच्यानंतर आता युवा नेते आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकमध्ये येत असून त्यांची पहिली सभा सोमवार (दि.६) रोजी होणार आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्यासाठी करावयाची मोर्चेबांधणी आणि एकूणच राजकीय घडमोडींच्या पार्श्वभुमीवर आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

खा.संजय राऊत यांच्या नाशिक दौर्‍यानंतर पक्षातील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला धक्का दिला. याआधीही राऊत विरूध्द खासदार गोडसे शाब्दिक युध्द चांगलेच रंगले होते. त्यामुळे दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पहायला मिळाल्या. दरम्यान ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. या सभेतून ते पक्षातून गेलेल्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा समाचार घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये देवळाली येथे धुमचक्री झाली होती तेथेच आदित्य यांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सभेसाठी जबाबदारीचे वाटप देखील करण्यात आले आहे. दरम्यान सकाळी आदित्य ठाकरे हे इगतपुरी येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर नाशिकमध्येही ते पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा करतील. सायंकाळी ६ वाजता नाशिकरोडच्या आनंद ॠषीजी शाळेमागील सुवर्ण सोसायटीच्या प्रांगणात जाहीर सभा होणार असल्याचे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -