घरताज्या घडामोडीठरलं! 'या' तारखेला आदित्य ठाकरे जाणार अयोध्या दौऱ्यावर

ठरलं! ‘या’ तारखेला आदित्य ठाकरे जाणार अयोध्या दौऱ्यावर

Subscribe

येत्या १५ जून रोजी ते अयोध्येला जाणार असून त्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्याकरता शिवसेनेचे १५ नेतेही अयोध्येला जाणार आहेत.

राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलेलं असताना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. येत्या १५ जून रोजी ते अयोध्येला (Ayodhhya) जाणार असून त्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्याकरता शिवसेनेचे (Shivsena) १५ नेतेही अयोध्येला जाणार आहेत. यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), वरूण सरदेसाई (Varun Sirdesai) यांचाही समावेश असल्याची माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. 15 जूनला रामलल्लाचं दर्शन घेऊन आदित्य ठाकरे शरयू किनारी आरती करतील अशी माहितीही राऊतांनी दिली आहे.

हेही वाचा – ‘रामलल्लांचे दर्शन प्रत्येक हिंदूने घेतले पाहिजे’; मनसेच्या अविनाश जाधवांचा थेट अयोध्येतून विरोधकांवर निशाणा

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) १ जून रोजी अयोध्येला जाणार होते. मात्र, त्यांच्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यानंतर, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या दौऱ्याची तारखी निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या दौऱ्याची तारीख आता ठरली असून शिवसेना नेते कामाला लागले आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

अयोध्या दौरा हा धार्मिक दौरा आहे, तिकडे शक्तीप्रदर्शन करणार नाही. त्यामुळे १५ जूनच्या दौऱ्याला महाराष्ट्रातून काहीच नेते जातील. मोठं वातावरण करायचं नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -