घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कर्नाटकात सत्ता स्थापन होताच सीमावादावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला सल्ला

कर्नाटकात सत्ता स्थापन होताच सीमावादावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला सल्ला

Subscribe

आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत कर्नाटकातील नव्या सरकारला सत्ता स्थापनेच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून या नव्या सरकारला सल्ला देखील दिला आहे.

कर्नाटकात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा भव्य शपथविधी सोहळा पार पाडला. यावेळी देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. या सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनकरून आमंत्रण दिले होते. पण काही कारणास्तव ते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत कर्नाटकातील नव्या सरकारला सत्ता स्थापनेच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून या नव्या सरकारला सल्ला देखील दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी (ता. 20 मे) मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Aditya Thackeray’s advice to Congress on border issues as soon as power is established in Karnataka)

हेही वाचा – Karnataka : सत्ता आली.. आता वचन पूर्तता; शपथविधी सोहळ्यातच राहुल गांधींनी केली मोठी घोषणा

- Advertisement -

“कर्नाटकात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आम्ही शुभेच्छा देतो. पण तेथील मराठी भाषिक बांधवांना त्रास देऊ नये. या बांधवांकडे लक्ष द्या असं आम्ही नवीन सरकारला सांगत आहोत”, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. तसेच त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर यावेळी भाष्य केले.

2 हजारांची नोट बंदी करण्यात येण्याच्या आरबीआयच्या निर्णयावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत आरबीआयने सतत पुढे मागे पुढे मागे केलं आहे. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे.” तर “आमचे सरकार असताना कोणतेही वाद झाले नाही, जातीय दंगली झाल्या नाहीत. आता निवडणुकीच्या तयारीसाठी हे वाद आणि दंगली होत आहेत का?,” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, “मुंबई महापालिका, महापौर आणि इतर मुद्द्यांवरून हे एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे , नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -