मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून टीका केली. आदित्य ठाकरे हे आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करमार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरेंनी आज संगमनेरमध्ये दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्या मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक आहे. आत भांडणे होता ती होत राहतील. आमचे काय, तुमचे काय. कारण आता तीन वेगवेगळे एकत्र बसलेले आहेत. यात गद्दार गॅग आहेच. महत्तवाची गोष्ट म्हणजे हे खोके सरकार महाराष्ट्राला जे धोके देत आलेले आहे. ते महाराष्ट्रासाठी काय करणार, हा प्रश्न पडतो.”
हेही वाचा – मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी मंत्रिमंडळ येतेय; राऊतांचा राज्य सरकारवर हल्ला
अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही
“कोणाला काय मिळणार आहे आणि घोषणा झाली तरी त्यांची अंबलबजावणी होणार आहे का? मागच्या वेळी देखील अतिवृष्टी झालेली होती. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले होते. अजूनही कोणत्याही शेतकऱ्यांला मदत मिळालेली नाही. ही गोष्ट स्पष होते. म्हणून किती खोटी आश्वासने या खोके सरकार”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केली आहे.
देशात लोकशाही आहे की नाही
“आज तर लोकशाही दिन आणि अशा दिवशी महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्य सरकार बसलेले आहे. आपल्या देशात लोकशाही आहे की नाही. हा प्रश्न पडलेला आहे. यामुळे आपण लोकशाही दिन साजरा करायचा की नाही, यावर प्रश्न पडतोच”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थिती केला आहे.
हेही वाचा – मोठी बातमी: ठाकरे गटाच्या आणखी एका आमदारावर कारवाई; रवींद्र वायकरांवर गुन्हा दाखल
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहाणी करणार
कंत्राटी कंपन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “बोटे दाखवण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी काय देतोय. आजचा आणि उद्याचा दौरा हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आहे आणि सरकारकडे मांडण्यासाठी आहे. आपल्या राज्यतील सरकार हे बिल्डर्स आणि बिल्डर आणि कंडक्टरचे राहलेले आहे. लोकांचे नाही.”