Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र गद्दार गद्दारच राहणार, आदित्य ठाकरेंचे खासदार राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटाला प्रत्युत्तर

गद्दार गद्दारच राहणार, आदित्य ठाकरेंचे खासदार राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटाला प्रत्युत्तर

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री असताना भाजपसोबत युतीची चर्चा केली, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, कोणी काय बोलायचे हा ज्यांचा त्यांचा अधिकार असतो. तसेच गद्दार गद्दार राहणार आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.

सर्कसमध्ये काहीही होऊ शकते –

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करुन नवी राष्ट्रीय कार्यकारणी घोषित केली आहे. या कार्यकारणीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दिपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी सध्या लोकशाहीची थट्टा सुरु आहे. आमच्याकडून राजकारण कमी झालं. सर्कसमध्ये काहीही होऊ शकते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली .

गद्दार गद्दारच राहणार –

- Advertisement -

राहूल शेवाळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कोणी काय बोलायचे हा ज्यांचा त्यांचा अधिकार असतो. तसेच गद्दार गद्दार राहणार आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

उद्याच्या केसचा उल्लेख –

उद्या पासून एक महत्वाची केस सुरू होत आहे. ही केस नुसती शिवसेनेसाठी नाही तर देशासाठी महत्वाची आहे. या देशात लोकशाही टीकनार की नाही यांच्यावर या केसमध्ये निकाल दिला जाईल, असे आदित्या ठाकरे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -