घरताज्या घडामोडीAditya Thackeray : शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष, आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याची घोषणा

Aditya Thackeray : शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष, आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याची घोषणा

Subscribe

सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान त्यांना न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशा परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे कोकणातील वातावरण चांगलच तापण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीनंतर कोकणातील वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष कोकणात पाहायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यामध्ये आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा घोषित करण्यात आला आहे. यामुळे आता कोकोणात पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ८ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत कोकण दौरा करणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे तळकोकणात सिंधुदुर्गाचाही दौरा करण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना विरुद्ध नितेश राणे असा संघर्ष पाहायला मिळाला होता. हिवाळी अधिवेशनात पायऱ्यांवर बसून म्याव म्याव असा आवाज नितेश राणेंनी काढला होता. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरुन सभागृहाकडे जात होते. नितेश राणेंच्या वर्तनावर शिवसेना नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या गोष्टीचे समर्थन करत नाही असे म्हटलं होते. यामुळे नितेश राणेंना चांगलीच चपराक बसली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडुकीमध्ये शिवसैनिक संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यामध्ये सुदैवाने संतोष परब बचावले आहेत. नितेश राणे यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालय, हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी स्वतः आत्मसमर्पण केलं आहे. सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान त्यांना न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशा परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे कोकणातील वातावरण चांगलच तापण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Republic Day Parade : महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रियतेत पहिलं बक्षिस, युपीचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -