आरटीईअंतर्गत ६२, १५५ बालकांचे प्रवेश

खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेला आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत २५ टक्के कोटा प्रवेशप्रक्रियेतील ऑनलाईन सोडतीत नाव आलेल्या बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत मंगळवारी संपली. संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार अखेरच्या दिवसापर्यंत ९० हजार ६८५ पैकी ६२ हजार १५५ बालकांचे प्रवेश झाले आहेत. तर २८ हजार बालकांना प्रवेश मिळूनही त्यांनी प्रवेश घेतलेला नाही.

खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेला आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी निवड होऊन पालकांनी पाल्याचा शाळेत प्रवेश न घेतल्यास पुन्हा संधी मिळणार नाही, असे स्पष्ट करुनही अनेक पालक प्रवेश घेण्याकडे फिरकले नाहीत. शालेय शिक्षण विभागाने ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोडत जाहीर केली होती. त्यापैकी आतापर्यंत ६२ हजार १५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

राज्यात असे झाले प्रवेश
शाळा -९०८६
एकूण जागा- १०१९०६
आलेले बालकांचे अर्ज- २८२७८३
प्रवेश दिले होते -९०६८५
प्रत्यक्ष झालेले प्रवेश- ६२१५५