बारावीच्या विद्यार्थ्यांना 9 जुलैला मिळणार प्रवेशपत्र

admission papers for class twelth supplementary examination available from saturday

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा जुलै-ऑगस्ट 2022 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना 9 जुलैपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना जुलै-ऑगस्ट 2022 च्या इयत्ता 12 वी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर 9 जुलैला सकाळी 11 वाजल्यापासून महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

ही प्रवेशपत्रे प्रिंटिंग करून देताना उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करण्यात यावी. तसेच प्रवेशपत्रामध्ये काही दुरुस्त्या असल्यास कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळामध्ये जाऊन त्या करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास त्यांना द्वितीय प्रत असा शेरा मारून दुसरे प्रवेशपत्र देण्यात यावे, अशा सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.