घरमहाराष्ट्रधक्कादायक: दत्तक मुलीनेच केली आई-वडिलांची गळा चिरून हत्या

धक्कादायक: दत्तक मुलीनेच केली आई-वडिलांची गळा चिरून हत्या

Subscribe

प्रिंयकाने रविवारी दुपारी आई-वडिलांना टरबूज खायला दिले. या टरबूजामध्ये तीने गुंगुचे औषध मिसळले. त्यानंतर तिचा प्रियकराला घरी बोलावून घेतले. कोयत्याने त्याने दोघांचा गळा चिरुन हत्या केली.

नागपूरमध्ये प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आई-वडिलांचीची दत्तक मुलीने हत्या केली आहे. प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्तवाडीमध्ये ही घटना घडली. रविवारी ही घटना घडली होती मात्र ही निर्घृण हत्या कोणी केली याचा पोलिसांकडून तपास सुरु होता. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. दत्तक मुलीनेच प्रियकराच्या मदतीने ही हत्या केली असल्याचे तपास उघड होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आयटी इंजिनिअर आणि क्रिकेटपटूला अटक

वाडी पोलिसांनी आरोपी प्रियंका चंपाती आणि तिचा प्रियकर मोहमम्मद इखलाख खान या दोघांना अटक केली आहे. प्रियकांने तिचे वडील शंकर चंपाती आणि आई सीमा चंपाती यांची गळा चिरून निर्घृण हत्या केली. शंकर आणि सीमा चंपाती यांनी मुल होत नसल्याने प्रियंकाला दत्तक घेतले होते. प्रियंका आयटी इंजिनिअर आहे. ती नागपूरच्या आयटी पार्कमधील एका कंपनीमध्ये नोकरी करते. तर तिचा प्रियकर इखलाख हा क्रिकेटपटू आहे. दोघांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रेमसंबंध आहेत.

- Advertisement -

नागपूर सोडून पुण्याला जाण्याची तयारीत

शंकर चंपाती हे कोसळा खाणीमध्ये कामाला होते. प्रियंका आठ महिन्याची असताना त्यांनी तिला दत्तक घेतले होते. प्रियंका आठवीमध्ये असताना तिचे इखलाखसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांच्या प्रेमाबाबत शंकर यांना माहिती मिळाली असता ते संतप्त झाले होते. यावरुन त्यांच्यात वाद होत होते. शंकर यांनी नागपूरमधील घर विकून पुण्यामध्ये जाण्याची तयारी सुरु केली होती. याबाबची माहिती प्रियंकाने तिच्या प्रियकराला दिली. त्यामुळे प्रेमता अडसर ठरणाऱ्या आई-वडिलांची हत्या करण्याचा प्लॅन दोघांनी केला.

कोयत्याने चिरला गळा

प्लॅननुसार प्रिंयकाने रविवारी दुपारी आई-वडिलांना टरबूज खायला दिले. या टरबूजामध्ये तीने गुंगुचे औषध मिसळले. त्यानंतर तिचा प्रियकराला घरी बोलावून घेतले. कोयत्याने त्याने दोघांचा गळा चिरला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दोघांनी घराबाहेर पडून वेगवेगळ्या दिशेला निघून गेले. प्रियंका आयटी इंजिनिअर असल्याने तिने पोलिसांना संशय येऊ नये यासाठी मोबाईल लोकेशन बदलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री उशीरा घरी येऊन तिने आई-वडिलांची हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

- Advertisement -

अखेर दिली हत्येची कबूली

पोलिसांनी चलाखी करत या तपासाची सुरुवात घरातूनच केली. प्रियंकाने पोलिसांचे लक्ष इकडे तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला. आयटी इंजिनिअर असल्यामुळे तीने प्रियकर आणि तिच्या मोबाईलचे लोकेशन तिच्या घराच्या परिसरात येणार नसल्याची काळजी घेतली होती. मात्र पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्सचा संपूर्ण अभ्यास करुन दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनी हत्येची कबूली दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -