घरमहाराष्ट्रनाशिकदुधात विष : घातक घटकांची भेसळ करणाऱ्या चौघांना अटक

दुधात विष : घातक घटकांची भेसळ करणाऱ्या चौघांना अटक

Subscribe

भेसळ केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पाथरे येथील घटनेने खळबळ

दुधात जीवघेण्या घटकांची भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नर तालुक्यातील पाथरी गावात उघडकीस आला आहे. या ठिकाणच्या दूध संकलन केंद्रावर दुधात पॅराफीन पावडरची भेसळ केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

भेसळ केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरे येथे अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ याच्या श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्रावर परिसरातील शेतकर्‍यांकडून गाईचे दूध खरेदी केले जात होते. ते कोपरगाव येथील न्यू शनैश्वर दूध संकलन केंद्रात विकले जात होते. दुग्ध व्यवसायात अधिक नफा मिळवण्यासाठी अक्षय गुंजाळ हा त्याच्याकडे असलेल्या दुधात ’पॅराफीन’ पावडर, सोयाबीन रिफाईंड तेल आणि मानवी आरोग्यास अपायकारक ’पॅराफीन’सदृश रंगहीन रसायनांची भेसळ करत असल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

नाशिक शहरातील अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात पॅराफीन रसायनाचे प्रत्येकी ४० लिटरचे आठ ड्रम या कारवाईत जप्त करण्यात आले. अक्षयने हे रसायन सिन्नर तालुक्याच्या उजनी येथून सिन्नर येथील हेमंत पवार आणि शेख नावाच्या व्यक्तींकडून विकत घेतल्याची कबुली दिलीय. त्यावरून अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी वावी पोलिसांत चारही संशयितांविरुद्ध तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -