ST Workers Strike : ही विध्वंसाची आक्रमकता नसून संयमाची आक्रमकता : अॅड. गुणरत्न सदावर्ते

विलिनीकरणाच्या संदर्भात अॅड. जनरल माझ्यासोबत चर्चा करतील..

एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसागणिक वाढत आहे. आम्ही सगळे कायद्याच्या राज्यात राहतो आणि आम्ही कायद्याने चालणारे कार्यकर्ते आहोत, असं वक्तव्य भाजपा नेते गोपिचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यानंतर विलिनीकरणाच्या संदर्भात आणि आर्थिक बोजा तसेच कायदेशीर बाबी जे आम्ही मंत्री म्हणून कायदेशीर पाठवल्या आहेत. त्या अर्थानेच आम्ही म्हणालो की, जे हुतात्म पत्करलेलं आहे. अशा कुणाला सुद्धा चुकीच्या अर्थाने पोच करू नका. म्हणजेच स्वर्गीय दत्ता सामंत हे कष्टकऱ्यांचे पुढारी होते. त्यांच्याप्रती शरद पवार जे बोलत आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य पुढे करण्यात येऊ नये. अशी माफक अवस्था व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, आमची भूमिका नकारात्मक नाहीये. देशातल्या इतर ठिकाणी आम्ही जे विलिनीकरण केलं. त्यासंदर्भातील माहिती आम्ही मागवली आहे. असं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

विलिनीकरणाच्या संदर्भात अॅड. जनरल माझ्यासोबत चर्चा करतील

मंत्र्यानी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सांगितलं की, आम्ही सुद्धा यावर काम करत आहोत. पण तुम्ही पुढे या आणि तुमचं धैर्य दाखवा. त्या आधारावरच आम्ही पुढचा निर्णय सांगू. अॅड. जनरल यांच्याशी ते चर्चा करतील, असं आम्हाला मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. विलिनीकरणाच्या संदर्भात अॅड. जनरल माझ्यासोबत चर्चा करतील. तसेच मंत्री सुद्धा बोलतील. शिवसेना हा पक्ष कष्टकाऱ्यांच्या संबंधीत आहे. त्यामुळे मंत्र्यांनी कृपाकरून पुढचं आवाहन जे संपाबाबत मागे घेण्याचं करण्यात आलंय ते करू नये. त्यांनी लोकांसंदर्भात आणि प्रवासासंदर्भात बोलले. आम्ही लोकांच्या जीव गेल्या संदर्भात बोललो. महाराष्ट्राला आज आम्ही सांगू इच्छितो की, अॅड. जनरलला बोलावलं तर त्यांचा अंतिम निर्णय काय आहे हे समजेल. तोपर्यंत कष्टकरी दुखवटा म्हणून आपापल्या ठिकाणी काम करणार नाहीत. हे अगदी स्पष्ट आहे.

आतापर्यंत आम्ही चुकीची आक्रमकता दाखवलेली नाही

आम्ही कोणत्याही प्रकारच्या विचित्र आणि वाईट घोषणा दिलेल्या नाहीयेत. आतापर्यंत आम्ही चुकीची आक्रमकता दाखवलेली नाही. मंत्र्यांना याबाबतीत अवगत करून दिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा रूग्णालयात होते. तेव्हा या देशाने आणि महाराष्ट्राने एक आंदोलन पाहिलं की लवकर मुख्यमंत्री बरे होऊदेत. अशा प्रकारची प्रार्थना केली. ही विध्वंसाची आक्रमकता नसून संयमाची आक्रमकता आहे. कोणत्याचं गाडीवर दगड मारला नसून कोणालाही अपशब्द अजूनपर्यंत बोललो नाहीये. असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा: कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर…गोपिचंद पडळकर यांचा इशारा