Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीसिन्नरमधून राष्ट्रवादीचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे विजयी

सिन्नरमधून राष्ट्रवादीचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे विजयी

Subscribe

सिन्नरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अ‍ॅड. माणिकराव काकाटे यांचा दणदणीत विजय झाला.तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उदय सांगळे यांचा पराभव झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत कायमच निर्णायक भूमिका बजावणारा मतदारसंघ म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयात सिन्नरने सिंहाचा वाटा उचलला. सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत रंगली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली होती. सांगळे यांच्यामुळे ही लढत चुरशीची होणार ठरली होती. मात्र या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी बाजी मारली आहे.

- Advertisement -

सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत 21 फेरीमध्ये आमदार माणिक कोकाटे यांची 40364 मतांची आघाडी घेतली होती. यानंतर माणिकराव कोकाटे यांना विजयी घोषित करण्यात आले. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे सिन्नर विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राहीले आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनचा भगवा फडकवला. 2019 सालच्या निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांचा 2072 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -