घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअ‍ॅडव्हेंचर राईडमुळे बळी; रिसोर्टला १२ लाखांचा दंड

अ‍ॅडव्हेंचर राईडमुळे बळी; रिसोर्टला १२ लाखांचा दंड

Subscribe

साहसी खेळ खेळताना महिला पर्यटक पडल्याने मृत्यू; २०१९ मधील घटनेचा लागला निकाल

नाशिक : अ‍ॅडव्हेंचर राईडमुळे बळी गेेलेल्या महिलेची नुकसानभरपाई आणि दंड म्हणून न्यायालयाने संबंधित रिसोर्टला तब्बल १२ लाखांचा दंड सुनावला आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिद्धी पारख (रा. जुना गंगापुरनाका, नाशिक) यांनी ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला होता.

बहिण कृती पटेल यांनी अ‍ॅक्टिव्हिटीज अ‍ॅडव्हेंचर पार्क येथे 29 डिसेंबर 2019 रोजी एक दिवसासाठी सात व्यक्तींसाठी रिसोर्ट बूक केले होते. पार्कमध्ये झीप लाईन राईड करत असताना प्रशिक्षकाने हार्नेस लावले व राईड करता केबलला हुकने लटकवले. परंतु, राईडसाठी सुरक्षेसाठी हेल्मेट कॅप दिलीच नाही. तसेच बेल्टही योग्यरित्या बांधलेला नव्हता. 20 ते 25 फूट उंच गेल्यानंतर बेल्ट अचानक तुटला आणि पटेल या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी कारमधून नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, रिसोर्टकडून कुठल्याही प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात आली नाही.

- Advertisement -

पटेल यांना शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे नेण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी सुमारे 11 लाख खर्च आला. तेव्हा रिसोर्ट व्यवस्थापनाने पैसे घेऊनही ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, अशी तक्रार ग्राहक न्यायालयात देण्यात आली होती. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे, सचिन शिंपी यांनी तपास करून रिसोर्ट मालकाला ग्राहक कायद्याअंतर्गत ग्राहकाला 12 लाख 2 हजार 926 रुपये आणि शारीरिक, मानसिक त्रासापोटी 1 लाख 50 हजार व तक्रार अर्जाचा खर्च 25 हजार देण्याचे आदेश दिले. तक्रारदार यांच्या वतीने अ‍ॅड. सुमेघा कुलकर्णी यांनी तर रिसोर्ट प्रशासनाच्या वतीने अ‍ॅड. जे. एन. शिंदे यांनी कामकाज पाहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -