Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला

Subscribe

माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असंही अजित पवार ट्विट करत म्हणालेत

मुंबईः राज्यात मोठ्या घडामोडी घडत असून, राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. या राजकीय नाट्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय.

काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून, मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असंही अजित पवार ट्विट करत म्हणालेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. रविवारीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापूर्वी कोविड संसर्ग झाल्यानंतरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अँटीजन टेस्टही पॉझिटिव्ह आली होती पण त्यांचा कोविड आरटीपीसीआर निगेटिव्ह आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

- Advertisement -

रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 6,493 नवे रुग्ण आढळले असून यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मृत्यू झालेले सर्वजण मुंबईतील आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णांची संख्या 79,62,666 वर गेली आहे आणि मृतांची संख्या 1,47,905 वर गेली आहे.


हेही वाचाः उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -