घरताज्या घडामोडीतहसीलदार ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ, विधिज्ञ असीम सरोदे ACB कडे तक्रार करणार

तहसीलदार ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ, विधिज्ञ असीम सरोदे ACB कडे तक्रार करणार

Subscribe

देवरे यांनी सरकारची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीनंतरही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल करुन ज्योती देवरेंनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. देवरेंच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. देवरेंच्याविरोधात आता ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार आहेत. मंगळवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सरोदे तक्रार दाखल करणार आहेत. या तक्रारीमुळे ज्योती देवेरेंच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रावादी आमदार निलेश लंके यांच्याविरोधात सुसाईड ऑडिओ क्लिपमधून नाव न घेता ज्योती देवरेंनी गंभीर आरोप केले आहेत.

तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याद्वारे मानसिक खच्चीकरण आणि शासकीय कामात त्रास दिला जात असल्याचा आरोप देवरेंनी केला आहे. परंतु ज्योती देवरेंविरोधात भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले असून त्याची चौकसी प्रलंबित असल्याचे उघडकीस आलं आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी देवरेंविरोधातील चौकशीचा अहवाल उपविभागीय आयुक्तांकडे सादर केला असून या अहवालातून ज्योती देवरेंवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

देवरेंविरोधात घोटाळ्याचे आरोप

अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सादर केलेल्या भ्रष्टाचाराच्या अहवालात ज्योती देवरे यांनी घोटाळे केल्याचे उघड झालं आहे. शासकीय कामांत हस्तक्षेप करुन हलगर्जीपणा केल्याचा आरोप देवरेंविरोधात करण्यात आला आहे. वाळू साठ्यातील गैरव्यवहारातून शासनाचे मोठं नुकसान आहे. जमीन प्रकरणात गैरव्यवहार करणे, कोविड सेंटर हॉस्पिटल विरोधात चौकशीतील कागदपत्र सादर न करणे, शासकीय कामातील आपली जबाबदारी नीटपणे पार न पाडणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे असे अनेक गंभीर आरोप ज्योती देवरे यांच्याविरोधात करण्यात आले आहेत.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. या क्लिपच्या नंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. ज्यात ज्योती देवरेंच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. देवरे यांनी सरकारची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसीलदार पदावर असताना जबाबदाऱ्या पार पाडल्या नाही असा ठपकाही देवरेंवर ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप : मला भेटू नका – ज्योती देवरेंवर अण्णा संतापले


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -