शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस, मत मांडण्यासाठी दिला 48 तासांचा अल्टिमेटम

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा दावा केला होता. यावरच आता नरहरी झिरवळ यांनी आपल्यावर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही असा दावा केलाय

advocate general and narhari zirwal decision to disqualify shiv sena 16 rebel mlas

महाविकास आघाडी सरकारला शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांनी धक्का दिल्याने आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान सेनेच्या या 16 बंडखोर आमदारांना आता अपात्र ठरवण्यात याव या मागणीचे पत्र शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिले आहे, त्यात 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांच मत मांडवण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या दरम्यान बंडखोर आमदारांना आपली भूमिका मांडण्यासाठी संधी असेल, मात्र या कालावधील त्यांनी मत मांडल नाही तर त्यांना अपात्र ठरवले जाईल. (advocate general and narhari zirwal decision to disqualify shiv sena 16 rebel mlas)

शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव काल विधीमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे देण्यात आला, यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या विषयावर सलग चार तास सविस्तर चर्चा झाली. यानंतर झिरवळ आणि महाधिवक्ता यांच्यात सलग एक तासाच्या बैठक झाली, या बैठकीत अखेर बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आज देखील नरहरी झिरवळ यांची बैठक पार पडली या बैठकीत 16 बंडखोर आमदारांनान नोटीस पाठवली असून त्यांना 48 तासांत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांनी दोन दिवसांचा वेळेत उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा दावा केला होता. यात अविश्वासाच्या ठरावाचा धागा पकडत आता नरहरी झिरवळ आमच्यावर अपात्रतेची कारवाई करु शकत नाही, असे स्पष्ट मत बंडखोर आमदारांनी मांडलेय. यामुळे आता भाजपसह महाविकास आघाडी सरकारच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत.

यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिला आहे. “शिवसेना सोडून काही लोक दूर जाऊन लपलेत. शिवसेने पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यागी भावनेने वर्षा निवासस्थान सोडून दिले. मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले आहेत. त्यांना शिवसेनेचा भगवा सोडून कमळाबाईचा साथ धरावी लागेल. कायद्यानुसार आता त्यांना गट निर्माण करता येणार नाही तर दुसऱ्या पक्षात जावं लागेल. आज आम्ही सर्व उत्तर दिले आहे. आज कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. येत्या 4 दिवसांत कारवाई होईल”, अस अरविंद सावंत म्हणाले. मात्र यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


बंडखोरांना आता भगवा सोडून पळावे लागेल : अरविंद सावंत