घरCORONA UPDATECorona: तलवारीने केक कापतानाचा केला टिकटॉकवर व्हिडिओ; दोघांवर गुन्हा दाखल

Corona: तलवारीने केक कापतानाचा केला टिकटॉकवर व्हिडिओ; दोघांवर गुन्हा दाखल

Subscribe

नवी मुंबईतील खारघर येथून वाहनाने हिवरे बुद्रुकला आलेल्या मुलाला क्वारंटाईन करण्याऐवजी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील जुन्नर येथे घडला आहे.

नवी मुंबईतील खारघर येथून वाहनाने हिवरे बुद्रुकला आलेल्या मुलाला क्वारंटाईन करण्याऐवजी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील जुन्नर येथे घडला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्यात आला असून त्याचा एक टिकटॉक व्हिडिओदेखील बनवण्यात आला आहे. या प्रकरणी ओतूर पोलिसांनी आरोपी स्वप्नील गाडेकर आणि वकील अरुण गाडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – Coronavirus : भाजपच्या नगरसेवकाला मॉर्निंगवॉक पडले महागात!

- Advertisement -

काय आहे प्रकरण

ॲड. अरुण गाडेकर यांचा मुलगा कर्मेश हा नुकताच नवी मुंबईतील खारघर येथून एका वाहनाने जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथील सहकारनगर येथे आला होता. सध्या जगात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून नवी मुंबईतही कोरोनाबाधित आढळले आहेत. माज्ञ कर्मेश प्रवास करून आला असतानाही त्याला क्वारंटाईन न करता त्याचा वाढदिवस ११ एप्रिल रोजी थाटामाटात करण्यात आला. शिवाय या मुलाचा केक कापताना तलवार वापरली. केक कापण्याच्या अगोदर तलवार हातात देऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टिकटॉक व्हिडिओदेखील तयार करण्यात आला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -