घरताज्या घडामोडीभारत आमच्यासाठी मोठा भाऊ; अफगाणी विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

भारत आमच्यासाठी मोठा भाऊ; अफगाणी विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

Subscribe

अफगाणी विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडल्या व्यथा

तालिबान्यांनी अफगणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. भारतात शिक्षण घेत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे अफगाणी विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे. अफगाणि विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा आणि मागण्या आदित्य ठाकरेंकडे मांडल्या आहेत. भारतात शिकत असलेले विद्यार्थी अफगाणिस्तानमध्ये परतल्यास त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो असे अफगाणी विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळाने म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी वीज खंडित केली असल्यामुळे नातेवाईकांसोबत संपर्क होण्यास अडथळे येत असल्याचेही अफगाणी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याची भेट घेतल्यानंतर अफगाणी विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, आदित्य ठाकरेंना विनंती केली आहे की, अफागणिस्तानमधील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आणि अफगाणी नागरिकांना भारतात आणण्यासाठी मदत करावी. अफगाण नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. त्यांच्या व्हिजा प्रक्रियेत अडचणी येत आहेत. इंडियन एम्बेसी अफगाणिस्तानमध्ये बंद झाली आहे. भारत आमच्यासाठी मोठा भाऊ असल्याचं अफगाणी विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत. तसेच अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार आहे. आमच्या व्यथा मांडण्यासाठी ठाकरेंची भेट घेतली असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आलं आहे. सध्या भारतात ५ हजारच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण पुर्ण करुन विद्यार्थी अफगाणिस्तानमध्ये परतले तर त्यांचा जीव धोक्यात येईल.


हेही वाचा : बिथरलेले चेहरे, जगण्याची आशा, अफगाणिस्तानातील भीषणता दाखवणारे विमानातील फोटो

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे परिवार अफगाणिस्तानमध्ये आहेत. विद्यार्थी पुन्हा अफगाणिस्तानमध्ये गेल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तालिबान्यांचे षडयंत्र असल्यामुळे त्यांनी नेटवर्क टॉवर बंद केले आहेत. यामुळे अफगाणिस्तानमधील लोकांशी संपर्क करणं कठींण झालं आहे अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भारताची भूमिका

अफगाणिस्तानमधील काबूलवर तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवल्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये तणावाचं वातावण निर्माण झालं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्यात आली होती. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांची दहशत खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका भारताने या युएनएससी बैठकीत मांडली आहे. तसेच संयुक्त राष्ट्र अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. भारताने पहिल्यांदाच आपली भूमिका अधिकृतरित्या मांडली आहे.


हेही वाचा : तालिबान्यांचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, UNSC बैठकीत भारताची भूमिका


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -